Corona virus news:Akola@985: मृतांचा आकडा पन्नाशीकडे...अकोला बनले 'डेंजर झोन'

Akola@985: मृतांचा आकडा पन्नाशीकडे...अकोला बनले 'डेंजर झोन'

३१४ कोरोनाबधित घेताहेत उपचार;


६२५ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज


नीलिमा शिंगणे-जगड

अकोला:  जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. सद्यस्थितीत एकूण ९८५ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. यापैकी ४६ जण (एक आत्महत्या व ४५ कोरोनामुळे) मयत आहेत. मृत्यू पावलेल्या रुग्ण संख्या अकोल्यात सर्वाधिक आहे. परंतू, डिस्चार्ज दिलेल्या  एकूण व्यक्तींची संख्या ६२५ पाहून थोडा दिलासा अकोलेकरांना मिळतो. तर सद्यस्थितीत ३१४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. अकोला डेंजर झोन (रेड झोन) मध्ये असला तरीही, अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळली आणि प्रशासनाने कडक निर्बंध लावले तर निश्चितच परिस्थिती नियंत्रणात येईल,अशी आशा सामान्य अकोलेकर व्यक्त करीत आहे.

१०१ अहवाल प्राप्त

शनिवारी दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १०१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८९ अहवाल निगेटीव्ह तर १२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान, दोन महिला रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला. तर सायंकाळी १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना कोविड केअर सेंटर मध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. तर  उर्वरित १२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ९८५ झाली आहे. सध्यस्थितीत ३१४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी  दिली आहे.

आजपर्यंत एकूण ७१८१ जणांचे नमुने

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ७१८१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ६८८१, फेरतपासणीचे ११६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८४ नमुने होते. आजपर्यंत एकूण ७१५९ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ६१७४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ९८५ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

 १२ पॉझिटिव्ह

शनिवारी दिवसभरात १२ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.  सकाळी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला असून चार पुरुष आहेत. ते  रजपुतपुरा,  बेलोदे लेआऊट हिंगणारोड, गायत्रीनगर कौलखेड,  हरिहरपेठ व बाळापूर येथील रहिवासी आहेत. तर  सायंकाळी प्राप्त अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात दोन महिला असून पाच पुरुष आहेत. ते हरिहरपेठ, अकोट फ़ैल, मोठी उमरी,चांदुर खडकी रोड, शंकर नगर, वाडेगाव व बाळापूर येथील रहिवासी असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी सांगितले.

दोन महिला मयत

दरम्यान शनिवारी दोन महिला रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू  झाला आहे. त्यातील एक ५२ वर्षीय महिला ही महिला अकोट फैल येथील रहिवासी असून ,१० जून रोजी दाखल झाली होती. तिचा १२ जूनच्या रात्री उपचारा दरम्यान  मृत्यू झाला. तर अन्य महिला ही ८० वर्षीय असून,देशपांडे प्लॉट जुनेशहर येथील रहिवासी आहे. ही महिला ८ जून रोजी दाखल झाली होती. शनिवारी सकाळी  तिचा मृत्यू झाला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.

१९ जणांना डिस्चार्ज

समाधानाची बाब म्हणजे शनिवारी  सायंकाळी १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात १२ महिला व सात पुरुष आहेत. त्यातील सात जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित १२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातील दोघे खडकी, दोन रामदास पेठ, दोन ध्रुव अपार्टमेंट, दोन सिंधी कॅम्प तर उर्वरीत जयहिंद चौक, श्रीहरी नगर, सिटी कोतवाली, आलेगाव पातूर, गजानन नगर, जुने शहर, हरिहर पेठ, माळीपूरा, रणपिसे नगर, हैदरपुरा व खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत, असे  सूत्रांनी सांगितले.

.........................




टिप्पण्या