corona virus news:Akola@914: ५७७ कोरोनाग्रस्त घरी सुखरूप परतले;२९४ पॉझिटिव्ह रुग्ण घेताहेत उपचार

Akola@914: ५७७ कोरोनाग्रस्त घरी सुखरूप परतले;२९४ पॉझिटिव्ह रुग्ण घेताहेत उपचार



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : दिवसेंदिवस कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत असली तरी, पूर्णपणे उपचार घेवून सुखरूप घरी परतणाऱ्याची संख्याही समाधानकारक आहे. अकोल्यात आतापर्यंतची बाधितांची संख्या एकूण ९१४ झाली असून, त्यापैकी ५७७ रुग्ण उपचार घेवून घरी परतले आहेत. सद्यस्थितीत २९४ रुग्ण उपचार घेत आहेत. 

गुरुवार,११ जून रोजी  दिवसभरात (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १३८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १०८ अहवाल निगेटीव्ह तर ३०  अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. दरम्यान आज एका रुग्णांचा उपचार घेतांना मृत्यू झाला.आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ९१४ झाली आहे. २९४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी  दिली आहे.

हे सुद्धा वाचा:‘कोविड-१९’शी सामना करा आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार पध्दतीने

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ६९५२ जणांचे नमुने चाचणीकरिता पाठवण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ६६६०, फेरतपासणीचे ११२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १८० नमुने होते. आजपर्यंत एकूण ६८६८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५९५४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ९१४ आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

३० पॉझिटिव्ह

गुरुवारी सकाळच्या अहवालात २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १० महिला व १८ पुरुष आहेत. त्यातील पाच  आदर्श कॉलनी, तीन खदान, दोन तार फैल, दोन इंदिरा नगर वाडेगाव,  दोन सिंधी कॅम्प येथील तर उर्वरित  दसेरा नगर, गुलजार पुरा,  दगडीपूल,  मोहता मिल,  अकोट फैल,  जीएमसी क्वार्टर,  गंगानगर, बंजारानगर, उमरी, शेलार फैल गुरुद्वारा पेठ जवळ,  नेहरु नगर डाबकी रोड, गुलशन कॉलनी,  टॉवररोड, जुने शहर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तर  सायंकाळी दोन अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात  एका पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. त्यातील एक मोहता मिल रोड व एक जुने शहर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.


एक मयत

दरम्यान, १० जूनच्या रात्री उपचार घेतांना  एका ७६ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही व्यक्ती हरिहरपेठ येथील रहिवासी आहे. ही व्यक्ती  ३ जून रोजी दाखल झाली होती ,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

२९४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत ९१४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ४३ जण (एक आत्महत्या व ४२ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ५७७  आहे. तर सद्यस्थितीत २९४ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.

............


टिप्पण्या