Corona virus news:कोरोना बाधित रुग्णांना मिळाले होमिओपॅथीक उपचार!

कोरोना बाधित रुग्णांना मिळाले होमिओपॅथीक उपचार!

शारीरिक व मानसिक रित्या रुग्ण झालेत तंदुरुस्त

अकोला: शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच वाढते रुग्णांचे प्रमाण बघता, जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांनी अकोला शहरातील परिस्थिती लवकरात लवकर आटोक्यात येण्या करिता सुरू असलेल्या उपचारा सोबत रुग्णांना होमिओपॅथीचे उपचार मिळावे, याकरिता हनेमनियन होमीओ फोरम , ( एच. एच. एफ.) अकोला यांना पी. के. वी. येथील शिवनेरी १ व २ येथील कोरोना पोझीटीव्ह रुग्णांना होमिओपॅथिक उपचाराची परवानगी दिली. त्यानुसार टीमच्या होमिओपॅथीक तज्ञांनी सलग तीन दिवस रुग्णांना होमिओपॅथीच्या नियमाप्रमाणे होमिओपॅथीक औषधोपचार केलेत व रुग्णाच्या  अभिप्रायची ( फॉलो- अपची ) नोंद घेतली. त्यानुसार काही रुग्णांना २४ तासात तर काहीना ४८ तासात बरे वाटल्याची माहिती स्वतः  रुग्णांनी दिली. 

इतर रुग्णांवर पुढे असेच उपचार सुरू ठेवण्याची मागणी रुग्णांनी केली आहे. याचीच दखल घेऊन शल्य चिकित्सक आणि जिल्हाधिकारी यांनी होमिओपॅथिक औषधोउपचार सुरू ठेवण्याची एच .एच.एफ. टीम अकोला यांना पुढे परवानगी दिली आहे. 

या उपक्रमासाठी टीमचे डॉ कपिल भाटी, डॉ राहुल अंबाडकर , डॉ सचितानंद गोसावी , डॉ योजना अंबाडकर (डागा) , डॉ प्रिती अग्रवाल, डॉ . गौरी भाटी, डॉ उज्वला भटकर, डॉ प्रगति लटूरिया, डॉ विभा ओतकर, डॉ श्वेता मस्के,  डॉ प्रकाश डिक्कर , डॉ रवि पवार, डॉ नेहा कनोजिया, डॉ आफ्रीन  यांनी अथक परिश्रम घेतले.
....................................................

टिप्पण्या