Corona virus news: अकोला@712:आज दिवसभरात 46 पॉझिटिव्ह!

अकोला@712:आज दिवसभरात 46 पॉझिटिव्ह!
अकोला,दि.४ : आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे १९३ अहवाल प्राप्त झालेत्यातील १४७ अहवाल निगेटीव्ह तर ४६ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज दुपारनंतर १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातल्या सात जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित तीन जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. आता अकोला जिल्ह्यात पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ७१२ झाली आहे. तर आजअखेर १९० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ५८०८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ५५३१, फेरतपासणीचे ११० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १६७ नमुने होते. आजपर्यंत एकूण ५७४७ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ५०३४ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल ७१२ आहेत. तर ६१ अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
आज ४६ पॉझिटिव्ह
आज सकाळी प्राप्त झालेल्या ४६ अहवालात  १९ महिला व २७ पुरुष आहेत. त्यातील  ११ जण खदान येथील,  सिटी कोतवाली तेथील नऊ जण,  अकोट फैल येथील पाच जण,  तारफैल येथील चार जण,  न्यू तापडीया नगर येथील दोन,  लकडगंज माळीपुरा येथील दोन जण तर जठारपेठ, इराणी वस्ती जुनेशहर, फिरदौस कॉलनी,  श्रेयानगर खडकी,  गुलशन कॉलनी,  जीएमसी क्वार्टर,  वाडेगाव बाळापूर,  देशमुख फैल, सोनटक्के प्लॉट,  दिवेकर चौक, शास्त्रीनगर, टॉवर चौक,  मोहतामिल गोरक्षण जवळ येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत. सायंकाळच्या अहवालात एकही पॉझिटीव्ह रुग्ण नाही.
दरम्यान आज  सकाळच्या अहवालात पॉझिटीव्ह आलेला  देशमुख फैल येथील रुग्ण हा यापुर्वी कोवीड केअर सेंटर मधून  सुट्टी झाल्यानंतर  पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीसाठी आला  होता. त्यामुळे त्यास नवीन रुग्ण म्हणून नमूद न करता एकूण पॉझिटीव्ह अहवाल संख्या ७१२ करण्यात आली आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.
सदर रुग्णाला आयसिएमआर च्या मार्गदर्शक सुचनांनुसार सुट्टी देण्यात आली होती.आणि या स्थितीत १० दिवसांनंतर त्याची इतरांना संक्रमण करण्याची शक्यता कमी असते. सदर रुग्णाला सुट्टी दिल्यानंतर दोन दिवसांनी परत कोरोना सर्दी,खोकला अशी  लक्षणे आढळल्यामुळे व सद्यस्थितीत वातावरणातील बदलामुळे  सदर लक्षणे आहेत किंवा नाहीत हे तपासण्यासाठी त्याचे दुबार चाचणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.व हेरुग्ण व त्यांच्या जवळच्या लोकांकरीता आवश्यक होते. सदर रुग्ण आता वार्ड क्रं.३० मध्ये पुढिल आवश्यक त्या उपचारासाठी दाखल आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी कळविले आहे.
१० जणांना डिस्चार्ज
दुपारनंतर १० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित तीन जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यात तीन महिला व सात पुरुष आहेत. हे रुग्ण  महसूल कॉलनी येथील तीन,  रामदास पेठ येथील दोन,  न्यु राधाकिसन प्लॉट येथील दोन , तर  तोष्णीवाल ले आऊट,  कौलखेड,  आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे,  अशी माहिती शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
१९० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत ७१२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील ३४ जण (एक आत्महत्या व ३३ कोरोनामुळे) मयत आहेत. तर आज १० जणांना डिस्चार्ज दिला आहे. आता डिस्चार्ज दिलेल्या  एकूण  व्यक्तींची संख्या ४८८  झाली आहे. तर सद्यस्थितीत १९० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी तीन रुग्ण हे मुर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत तर एक जण कोविड केअर सेंटरला दाखल आहे, अशी माहिती  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी  दिली आहे.
.........

टिप्पण्या