कोरोना योद्धा:पत्रकार बाळासाहेब ठाकरे "कोरोना योध्दा" गौरवपत्राने सन्मानित

पत्रकार बाळासाहेब ठाकरे "कोरोना योध्दा" गौरवपत्राने सन्मानित
अकोला: पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात मागील  तीन दशकांहूनही अधिक काळापासून निस्वार्थपणे कार्य करुन समाजमनाला जागरुक करुन त्यांना त्यांचे न्याय,हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी सतत तत्पर असलेले आणि सध्या वृत्तपत्र तसेच विविध डिजिटल मार्गाचा अवलंब करुन 'स्वतःसोबत परिवाराची काळजी घ्या व घरातच थांबा'असा अजेंडा घेऊन समाजामध्ये जागरुकता निर्माण करुन राष्ट्रीय कार्याला हातभार लावत असलेले जिल्ह्यातील  पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते तथा 'दै.मातृभूमी'या वाचकप्रिय वृत्तपत्रात कार्यरत असलेले बाळासाहेब पुंडलिकराव ठाकरे यांच्या या समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन मुक्ताईनगर,जळगाव खान्देश येथील आयएसओ प्रमाणपत्र प्राप्त शिवचरण उज्जैनकर फाऊंडेशनच्या वतीने ऑनलाइन पध्दतीने 'कोरोना योध्दा गौरवपत्र'देऊन सन्मानित केले आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी ग्रामीण भागामधून दैनिकांचे कानशिवणी ग्राम प्रतिनिधी म्हणून आपल्या वृत्तपत्र क्षेत्रातील कारकिर्दिला सुरुवात केली.त्यासोबतच गावात तीस वर्षापूर्वी इंग्रजी माध्यमाची शाळा,गरजू महिलांसाठी निशुल्क शासनमान्य डिप्लोमा प्रमाणपत्र वर्ग,ग्राम सुधारणेसाठी पुढाकार घेऊन त्यासाठी आटोकाट प्रयत्न करुन तशा सुधारणा घडवून आणणे व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ते अहोरात्र कार्यरत असत.'दै.अकोला दर्शन' वृत्तपत्रात आवृत्ती संपादक,'दै.सिंध मराठा'या दैनिकाचे कार्यकारी संपादक तसेच दैनिक लोकशाही वार्ता   या वृत्तपत्रात अत्यंत महत्वपूर्ण पदांसोबतच अनेक दैनिकांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडल्या.
 त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत अकोला जिल्हाध्यक्ष म्हणून भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे काम अनेक वर्ष सांभाळले.यासोबतच माळी समाज संघटना, अ.भा. अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्र्ट पत्रकार संघ,शुभम मराठी बाल,कुमार,युवा व नवोदित साहित्य मंडळ तसेच चेंज द लाइफ राष्ट्रीय विद्यार्थी, पालक,पदवीधर व शिक्षक संघटनेच्या माध्यमातून पत्रकार मेळावे,साहित्य संमेलने,बेरोजगार मेळावे,योगा शिबिरे,उपोषणे,आंदोलने असे भरीव कार्य केले व करीत आहेत.
आजवर त्यांना महाराष्ट्र पत्रकार संघ पुरस्कार,नागपूर;संघर्ष पुरस्कार,खडकी, भ्रष्टाचार निर्मूलन समिती सन्मान,राळेगण सिध्दी; माळी युवा गौरव पुरस्कार,शेगाव, आनंद पुरस्कार,अकोला यासह विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.
.........

टिप्पण्या