Road accident:वरवट शेगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार युवकाला उडविले; युवकाचा जागीच मुत्यू

वरवट शेगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार युवकाला उडविले; युवकाचा जागीच मुत्यू
मनार्डी फाटा जवळील घटना

वरवट बकाल: येथील रहिवासी उमेश महादेव वानेरे २१ वर्षीय युवक हा बजाज सिटी १०० दुचाकीने वरवट बकाल वरून पातुर्डा गावात नातलगाकडे जात असतांना दुचाकी क्र एम एच २८ बीएफ ५३१५  सिटी बजाज कंपनीच्या दुचाकीला  मनार्डी फाटा जवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने दुचाकीसह सदर युवक रसत्यालगत पडून जागीच मुत्यू झाल्याची घटना दि ५ जुन रोजी रात्री अंदाजे ११ वाजता दरम्यान घडली.  
याबाबत थोडक्यात माहिती असे प्रकारे आहे कि, वरवट बकाल येथील २१ वर्षीय युवक उमेश महादेव वानेरे ५ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास वरवट वरून शेगाव रस्त्यावरील पातूर्डा गावात सिटी बजाज दुचाकी क्र एम एच २८ बीएफ ५३१५ ने  नातेवाईका कडे जात असतांना मनार्डी फाटा जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने या अपघातात सदर युवकाचा जागीच मुत्यू झाला. 
मृतकाचे प्रेत रात्रभर तेथेच पडलेले असता ६ जूनच्या सकाळी  शेगाव कडे जाणाऱ्या काही लोकांच्या निदर्शनास आले म्हणून सदर घटना उघडकीस आली. सदर युवक अविवाहीत होता.  उमेश मनमिळाऊ स्वभावाचा असलंयाने दुदैवी अपघातात मुत्यूने वरवट बकाल व पातुर्डा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.  घटना स्थळी तामगाव पो स्टे चे पोलीस उपनिरीक्षक विखे पाटील, ए एस आय साळवे, पो कॉ सुधिर इंगळे यांनी भेट देऊन पंचनामा केला. प्रेताचे वरवट बकाल येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईंच्या ताब्यात देण्यात आले.  मृतकाच्या पश्चात आई, वडिल,१ भाऊ, ३ बहिणी आहेत.
पुढील तपास तामगाव पोलीस करित आहे.
.........

टिप्पण्या