Tukadoji Maharaj:जिल्ह्यात ३२८ गावांमधील कुटूंबांमध्ये गुरूदेव सामुदायिक प्रार्थना

जिल्ह्यात ३२८ गावांमधील कुटूंबांमध्ये गुरूदेव सामुदायिक प्रार्थना
अकोला: वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सर्वधर्म समभावातून एकात्मता साधण्याच्या उध्देशाने  सुरू केलेल्या सामुदायिक प्रार्थनेचे अकोला जिल्ह्यातील ३२८ गावांमध्ये कुटूंबामधून आयोजन करण्यात आलेले आहे.अ.भा.गुरूदेव सेवा मंडळाकडून प्रत्येक तालूक्यातील ४१गावांमध्ये ४१गुरूदेव उपासकांवर या सेवेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अ.भा.गुरूदेव सेवामंडळाचे जिल्हा सेवाधिकारी  रविन्द्र मुंडगावकर, जिल्हाप्रचारक डॉ.अशोक रत्नपारखी यांचे मार्गदर्शनात व केंन्द्रीय कार्यकारिणी सदस्य  भानुदास कराळे यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात प्रत्येक दिवशी ३२८ गावात कुटूंबांमधून सामुदायिक प्रार्थना तसेच, यामध्ये प्रत्येक गावात वड, पिंपळ, आवळा,बेल व उंबर याप्रमाणे प्रत्येकी ५ प्रमाणे एकून १६४० वृक्षांची शेवटी लागवड करून त्यांच्या ५वर्ष संगोपनाची जबाबदारी निश्र्चित करण्यात येणार आहे.
दि.२१मे पासून सुरू झालेल्या या उपक्रमाची दि.३०जून २०२० रोजी सामुदायिक प्रार्थननेने समारोप होणार आहे.
उपासक प्रचारक निर्माण व्हावेत या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन असून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख व तालूका प्रमुखांवर ह्याबाबतच्या जबाबदाऱ्या सोपविलेल्या असून त्यांच्या मार्गदर्शनात गुरूदेव उपासक या नित्यक्रमात सहभागी होत आहेत.अशी माहिती अ.भा.गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख संजय देशमुख यांनी दिली आहे.
.........

टिप्पण्या