Sport news:फुटबॉल खेळाडूंचे आवडते प्रशिक्षक गुलाम अली यांचे निधन

फुटबॉल खेळाडूंचे आवडते प्रशिक्षक गुलाम अली यांचे निधन

अकोला: उस्मान आझाद हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक व राष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक गुलाम अली खान यांचे गुरुवार,१४ मे रोजी अकोट येथे निधन झाले.मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. त्यांनी अकोला फुटबॉलला एक नवी उंची दिली होती. त्यांच्या सक्रिय कारकिर्दीत अकोला फुटबॉलने सोनेरी दिवस पाहिले होते.

जवळपास आठशे खेळाडूंना त्यांनी  फुटबॉलचे प्रशिक्षण दिले. १५० हुन अधिक राष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडविले.  ६० पेक्षा अधिक त्यांचे शिष्य शासकीय नोकरीत उच्चपदस्थ आहेत. क्रीडा शिक्षक नसूनही,तयांनी नेहमी शालेय फुटबॉल मध्ये रुची दाखविली. शाळा व्यवस्थपनाने देखील पूर्ण सहकार्य केले. उस्मान आझाद संघ राष्ट्रीय पातळीवर देखील बलाढ्य मानला जायचा.आजही उस्मान आझादचा तोच दरारा कायम आहे,तो केवळ गुलाम अली (सर) यांच्यामुळे.

सेवनिवृत्ती नंतरही त्यांनी उस्मान आझादच नव्हेतर,अकोल्यातील इतर क्लबच्या खेळाडूंना प्रशिक्षण देत होते. वयाच्या ८२ व्या वर्षी देखील त्यांनी मैदानावर येणे सोडले नव्हते. निस्वार्थ भावनेने त्यांनी फुटबॉलची सेवा आयुष्यभर केली.

मोहसिंन शहीदी ,माजी क्रीडामंत्री अजहर हुसैन ,करीम खान , वली मोहमद यांच्या  मार्गदर्शनात ते नेहमीच सक्रिय राहिले. अकोला जिल्हा फुटबॉल ला नव्या उंचीपर्यंत पोहचविण्यात त्यांचे मोठे  योगदान राहिले. त्यांचा शिष्यवर्ग खूप मोठा आहे. यामध्ये प्रामुख्याने सय्यद जावेद अली, सय्यद जलालुद्दीन, अरविंद कक्कड़,अफसर पहेलवानं, कलीम कुरेशी, सलीम खान ,अनिस् गौरव, सलीम कोनी, क़ाज़ी नतिक उद्दीन बाबर,इल्लियास खान, इम्रान खान, मो.सादिक, शेर अली,बंटी अतहर  खान, मो. जमील, मसूद राणा, अंसार खां, सैयद नईम, नाज़िम, सईद खान यांचा समावेश आहे. अलीकडच्या काळात अकोल्यात यशस्वी पार पडलेल्या आर.आर.आबा व महापौर चषक अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेतही त्यांचे भरीव योगदान राहिले.

गुलाम अली यांचा दफन विधी अकोट येथे गुरुवारी पार पडला. लॉकडाउन मुळे दफनविधी करिता त्यांचे शिष्य व मित्र वर्ग अकोटला जावू शकले नाही. जेष्ठ फुटबॉलपटू  देवीदास सर्जेकर, शेख चाँद,सुरेश निंबाळकर, अब्दुल सरफराज, अब्दुल रफीक, अब्दुल राउफ्,दिलीप बिसेन, चाँद खान, जुम्मा चौधरी, हरिहर मिश्रा, शेख उसमान, शेख हाशम,संजय पटेकर, अब्दुल फहीम, मो. फ़राज़, विशाल पांडे यांनी शोक संवेदना व्यक्त केल्या. जिल्हा क्रीड़ा कार्यालयाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

......


टिप्पण्या