special Artical falun dafa:आज जागतिक फालुन दाफा दिवस 💐

आज जागतिक फालुन दाफा दिवस 
   मन व शरीराची साधना फालुनदाफा

फालुनदाफा (फालुन गोंग) ही मन आणि शरीराची उच्च दर्जाची साधना पध्दती आहे. दरवर्षी १३ मे हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जातो. या दिवशी दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते यंदा कोरोना मुळे लाॅग डाऊन असल्याने सर्वत्र आॅनलाइन काॅन्फरन्स आयोजित केलेल्या आहेत. फालनुदाफा पध्दती १९९२ मधे चीन मध्ये मास्टर ली होंगजी यांनी स्थापना केली. सद्यस्थितीत  जगातल्या १४० पेक्षा अधिक देशांमधे दहा कोटी हून अधिक साधक आहेत.
फालनुदाफाचे संस्थापक मास्टर ली होंगजी यांना जगभरातनू१५०० पेक्षा अधिक पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
मास्टर ली होंगजी यांना नोबल शांतता पुरस्कार  तसेच स्वतंत्र विचार करीता सखारोव पुरस्काराचे सन्मानित केलेलेे आहे. फालुन गोंगचा अभ्यास आज जगभर केला जातो, मात्र फालुन गोंगच्या जन्मभूमीत दाफाच्या साधकावर अत्यंत अमानवी अत्याचार होत आहे. फालुन दाफामुळे साधकाना मिळणारे निरोगी आरोग्य आणि  आध्यात्मिक समाधान यामुळे चीनमधेही ही पद्धत खूप लोकप्रिय झाली. १९९९ पर्यंत  किमान दहा कोटी लोकांनी या साधनेचा अभ्यास केला. त्यावेळी चीनमधील कम्युनिस्ट पक्षाची सदस्यता सात कोटी होती. फालुन दाफा साधकाची वाढती संख्या बघून चीनी कम्युनिस्ट लोकांच्या पोटात दुखू लागले. फालुन दाफा चा हा शांततामय अभ्यास  असताना देखील राजकीय सत्तेला हे
एक आव्हान वाटू लागले. आणि  राजकीय  सत्ते करता व हा धोका ठरू शकतो. या भितीपोटी २० जुलै१९९९ रोजी फालुन दाफावर बंदी घालण्यात आली आणि फालुन दाफा च्या समूळ उच्चाटनाकरिता  एक मोहीम राबविली गेली. साधकावर क्रूरपणे अत्याचार सुरू केले तेआजतागायत सुरूच आहेत. गेली 20  वर्षे चीनमध्ये होत असलेल्या अत्याचाराला पायबंद घालण्यात यावा याकरिता  सातत्याने प्रयत्न होत
आहेत.
आज माणसाचे जीवन फार धकाधकीचे आणि धोकादायक झाले आहे. अत्यंत धावपळीच्या आजच्या जीवनात माणूस तणावग्रस्त झालेला असतो.  प्रत्येक मानवाला निरोगी , तणावरहित आणि स्वास्थ्यपूर्ण जीवनाची अभिलाषा असते. मात्र आम्ही जेवढी इच्छा तणावरहीत जीवनाची बाळगतो तेवढे अधिक त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न होत असतो. निरोगी व आरोग्यदायी बाबी करता आम्ही काही निश्चित उद्दिष्ट ठेवतो. मात्र सातत्याने  त्या उद्दिष्टापासून दूर पळण्याचा प्रयत्न दुसरीकडे होत राहतो. दैनंदिन जीवनामधे अनेक प्रश्न सतत माणसाला भेडसावत
असतात. यात कौटुंबिक समस्या या, रोजगारासबंधींचे प्रश्न, अंतर्गत वैयक्तिक संघर्ष कौटुंबिक कलह, नातलगाच्या आरोग्य विषयक समस्या, नोकरीतील ताण-तणाव या प्रश्नाना सतत सामोरे जावे लागते. या समस्यांचा गुंता सोडविण्यासाठी आमच्या जवळ काही पर्याय आहेत का? या
प्रश्नाचे उत्तर आपल्याला प्राचीन साधना अभ्यास पद्धतीमधे हमखास सापडते. या साधना अभ्यासाचे नाव “फालुन दाफा” आहे याला फालनुगोंग नावानेही ओळखले जाते. फालुन दाफा मधे पाच प्रकारच्या शारीरिक व्यायाम पध्दतीने मानसाच्या शरीरातील सर्व शक्ती नाड्या मोकळ्या केल्या जातात; शरीर शुध्दीकरण, मुक्ती आणि अंतर्मनाची शांती मिळविण्यासाठी  अत्यंत प्रभावी आणि  उपयुक्त अशी ही साधन पद्धती आहे. फालुन दाफा ही मन आणि  शरीराची साधना आहे. व्यायामामुळे  माणसाच्या शरीरात उर्जा स्त्रोत निर्माण होतो. याशिवाय  या
अभ्यासातून सत्य करुणा आणि सहनशीलता या मुलभूत सद्गुण तत्त्वांच्या पालनातून नैतिक गुण, विकासातून मानवाचे चरित्र उन्नत करण्याची
शिकवण दिली जाते आपल्या  मनाची स्थिती ही शरीराला प्रभावित करते. यातून एक प्रकारे आपल्या  मनाची सकारात्मक अवस्था निर्माण होऊन शरीर स्वास्थ्य सुदृढ करण्यासाठी सहायक सिद्ध होते. या कारणामुळेच फालुन दाफा अभ्यास अत्यंत प्रभावशाली आहे.
जगातील लाखो लोकांनी फालुन दाफा साधना अभ्यास हा आपल्या जीवनाचे दैनंदिन आयुष्यातील महत्वाचे अंग बनवले आहे. लोकांना हा साधना अभ्यास आपल्या दररोजच्या  जीवनात निरोगी शरीर आणि  सामंजस्य पूर्ण जीवन जगण्याचा एक योग्य मार्ग आणि  सुखमय आयुष्याची गुरूकिल्ली आहे. ही साधना पद्धती शिकण्यासाठी माणसाजवळ एका मोकळ्या मनाची आणि उदार अंतःकरणाची गरज असते .
हा अभ्यास कोणीही, कोणत्याही क्षणी शिकायला सुरवात करू शकतो.  या अभ्यासाविषयी अधिक माहितीसाठी www.falundafa.org या वेबसाईटवर फालुन दाफाविषयक पुस्तके, शारीरिक व्यायाम सराव पद्धती, आणि अभ्यासा विषयी माहीती उपलब्ध आहे.
भारतात फालुन दाफा ही साधना दिल्ली , मुंबई, बंगलोर , हैदराबाद , नागपूर , पुणे इत्यादी ठिकाणी लोक हजारोंच्या संख्येने लोक करीत आहेत. अनेक शाळा, महाविद्यालयामधून फालुन दाफा प्रशिक्षण दिले जात आहे. याचा सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती मध्ये दिसून येत आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थीच्या नैतिक गुण आणि सुदृढ निरोगी आरोग्य यावरही साधनेचा चांगला परिणाम दिसून येत आहे. फालुन दाफा प्रात्यक्षिक विविध ठिकाण साधकाकडून सादर केल्या जातात. जेणेकरून या साधनेचा प्रचारप्रसार होईल. विविध शहरामधून पुस्तक प्रदर्शन असो किंवा सार्वजनिक कार्यक्रम असो, फालुन दाफा प्रात्यक्षिक आणि माहीती पत्रकांचे वाटप साधक करीत असतात. फालुन 
दाफा शिकण्यासाठी वयाचे बंधन नाही. जागेचे बंधन नाही. किंवा वेळेेचेही बंधन नाही. आपापल्या सोयीनुसार ही साधना आपल्याला करता येते ज्या कुणाला फालुन दाफा विषयी जाणून घ्यायचे असेल त्यांच्या याकरिता  निशुल्क कार्यशाळेचे आयोजन केले जाते. शाळा,महाविद्यालय, कार्यालय इत्यादी ठिकाणी फालुन दाफाचे आयोजन करण्यात येते आणि लोकांपर्यंत दाफा पोहोचण्यासाठी  साधक प्रयत्न करत असतात. सत्य ,करूणा व सहनशीलता या नैतिक गुणांवर आधारित फालुन दाफा साधनेत व्यक्तीच्या नैतिक गुण साधनवेर भर दिला जातो. तसेच नियमित व्यायाम आणि मानसिक विकास याकडेही लक्ष दिले जाते. यामधे दुर्व्यवहार सोडणे, त्याग आणि प्राप्ती याची जाणीव होणे, मोहभावाचा  त्याग इत्यादी विषयांवर अभ्यास केला जातो. शारीरिक व्यायामासोबत फालुन गोंग आणि  जुआन फालुन या दोन पुस्तकांचे सातत्याने नियमित वाचन हा सुद्धा साधनेचा एक भाग आहे.नागपुरात संपर्क साधण्यासाठी संजीवनी अपार्टमेंट रामेश्वरी मार्ग मेडिकल कॉलेज मागे येथे भेट द्या मो 9822569386 /7020149291.

टिप्पण्या