Lockdown:लॉकडाउन मध्ये नेत्याचा वाढदिवस; केली नियमांची पायमल्ली!

लॉकडाउन मध्ये नेत्याचा वाढदिवस; केली नियमांची पायमल्ली!

अकोला : अकोल्यात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता प्रशासनाने जिल्ह्यात दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाउन घोषित केला आहे.  मात्र, असं असतांनाही आपल्या नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा मोह कार्यकर्त्यांना आवरत नाही. दोन दिवस जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी असतांना,  बार्शीटाकळी तालुक्यातील माझोड येथे भाजपच्या तालुका अध्यक्षांच्या वाढदिवस निमित्त मंगळवार,१९ मे रोजी सभा बोलाविण्यात अली होती. मात्र, या कार्यक्रमात तालुकाध्यक्ष अनुपस्थित होते. या कार्यक्रमात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगांना निधी वाटप करण्यात आला. कार्यक्रम आयोजनाचा उद्देश जरी चांगला असला तरी, या कार्यक्रमात संचारबंदीचे आणि कोरोना संदर्भात सरकारने घालून दिलेली सामाजिक आणि वयक्तिक नियमांची पायमल्ली झाल्याचे चित्र आहे. या कार्यक्रमात फिजिकल डिस्टनसिंग नियमाचा पूर्णपणे फज्जा उडाला. गावात एकूण ३१ दिव्यांग बांधव आहेत. मात्र, काही दिव्यंगानी निधी न मिळाल्याची तक्रार प्रसार माध्यमाकडे व्यक्त केली.

.....

टिप्पण्या