coronavirusnewsअकोला मनपा क्षेत्र वगळून मद्यविक्रीस बुधवार पासून परवानगी

अकोला मनपा क्षेत्र वगळून मद्यविक्रीस बुधवार पासून परवानगी

अकोला,दि.५ : अकोला जिल्ह्यातील किरकोळ मद्यविक्री,वाईन शॉप बियरशॉपी, देशीदारु किरकोळ विक्री, मद्य निर्माण्या , ठोक विक्रेते या अनुज्ञप्त्यांचे व्यवहार बुधवार दि. ६ मे पासून सुरु करण्यास अटी व शर्तींच्या अधिन राहून सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. तथापि अकोला महापालिका क्षेत्र मात्र यातून वगळण्यात आले आहे.

घालून दिलेल्या अटी व शर्ती याप्रमाणे-

मद्य निर्माण्याबाबत : ( नमुना सीएल -१ )

ग्रामिण भागातील सर्व मद्य निर्माण्या चालु होतील. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने घालून दिलेल्या प्रमाणित कार्यपद्धती या मद्य निर्माणीला लागु राहतील. निर्माणितील सर्व कामगारांची थर्मल स्कॅनिंग करावी व ज्या कामगारास सर्दी खोकला व ताप या सारखी लक्षणे आहेत त्यास निर्माणीमध्ये प्रवेश देवु नये. मद्य निर्माणीमध्ये सोशल डिस्टींगचे कसोशिने पालन करावे.

घाऊक /ठोक विक्रेत्याबाबत : ( अनुज्ञप्ती नमुना एफएल १, सीएल २. )

ग्रामीण भागातील सर्व घाऊक मद्य अनुज्ञप्त्या चालु होतील. शहरी भागातील कंटेनमेंट झोन वगळून इतर क्षेत्रातील सर्व घाऊक मद्य विक्रेत्यांचे व्यवहार सुरु करता येतील. मात्र सांयकाळी पाच वाजल्यानंतर व्यवहार सुरु ठेवता येणार नाहीत. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने घालून दिलेल्या प्रमाणित कार्यपद्धती व मार्गदर्शक तत्वे घाऊक विक्रेत्यांवर बंधनकारक राहतील. संबधीत अनुज्ञप्तीमधील सर्व नोकराची / कामगारांची थर्मल स्कॅनिंग करावी. व ज्या नोकरास सर्दी, खोकला व ताप या सारखी लक्षणे आहेत त्यास अनुज्ञप्तीमध्ये प्रवेश देवु नये. घाऊक विक्रेत्यांनी ५० टक्के मनुष्यबळावर काम करुन सोशल डिस्टींगचे कसोशीने पालन करावे.

किरकोळ मद्यविक्री दुकाने -

अकोला जिल्ह्यातील  अकोला महापालिकाक्षेत्र  वगळून किरकोळ मद्यविक्री अनुज्ञपत्यांना केवळ सिलबंद मद्यविक्री करण्यास परवानगी राहील. ग्रामीण भागात व शहरी भागात (अकोला महानगरपालीका क्षेत्र वगळून) नगरपरिषद हददीतील मद्यविक्री दुकान सुरु करता येतील. सिलबंद मद्यविक्री करणाऱ्या दुकानासमोर पाच पेक्षा अधिक ग्राहक एकावेळी असता कामा नये. दोन ग्राहकांमध्ये किमान सहा फुटाचे अंतर असणे अनिवार्य आहे. त्यासाठी प्रत्येक सहा फुटावर वर्तुळ आखून घ्यावे. संबधीत अनुज्ञप्तीधारकाने सर्व  नोकर व ग्राहकांची थर्मल स्कॅनिंग करावी व ज्या नोकरास/ग्राहकास सर्दी, खोकला व ताप या सारखी लक्षणे आहेत अशा व्यक्तिंना दुकानात प्रवेश देवू नये. दुकान व सभोवतालचा परिसर दर दोन तासांनी निर्जंतूकीकरण करणे आवश्यक राहील. येणाऱ्या ग्राहकांसाठी हॅन्ड सॅनिटायझर मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित अनुज्ञप्तिधारकाची राहिल. भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने घालून दिलेल्या प्रमाणित कार्यपद्धती पालन बंधनकारक असेल. किरकोळ मद्यविक्री दुकानामध्ये लॉकडाऊन बाबतची मार्गदर्शक तत्वे पाळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ नेमण्याची जबाबदारी संबंधित अनुज्ञप्तीधारकांची असेल.

किरकोळ विदेशी मद्यविक्रीची दुकाने सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यत  सुरु ठेवता येतील. किरकोळ देशी मद्यविक्री सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.

अन्य सुचनाः-

कोणत्याही परिस्थितीत उघडलेल्या मद्य विक्रीच्या आस्थापने मध्ये मद्यप्राशन होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुकानाच्या प्रवेशव्दारवर दर्शनी भागात सहजरित्या दिसेल अशा फलकावर दुकानाच्या कामकाजाच्या सुधारीत वेळा, एकावेळी दुकानासमोर पाच पेक्षा अधिक व्यक्ती असु नयेत,सोशल डिस्टन्सींग व मास्क चा वापर अनिवार्य आहे, सर्व ग्राहकांचे धर्मल स्कॅनिंक करण्यात यावे. सर्दी, खोकला व ताप या सारखी लक्षणे असणाऱ्या व्यक्तींनी दुकानात प्रवेश करु नये. दुकानात मद्य प्राशन करता येणार नाही. परिसरात थुंकण्यास सक्त मनाई आहे इ. सुचना लावण्यात याव्यात. आवश्यकता भासल्यास विक्रेते जिल्हा प्रशासनाकडे आवश्यक पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देण्यासाठी विनंती करु शकतील.  

नुतनीकरण शुल्क भरणे अनिवार्यः-

ज्या अनुज्ञप्तीधारकांनी नुतनीकरणाचे प्रस्ताव विहीत शुल्क, भरुन सादर केले आहेत. अशा उपरोक्त अबकारी अनुज्ञप्तीधारक यांनी व्यवहार सुरु करावेत व ज्यांनी विहीत शुल्काचा भरणा केलेला नाही अशा अनुज्ञप्तीधारकांना विहीत शुल्क, भरुन विहीत पाहोच घेतल्या शिवायअनुज्ञप्तीचे व्यवहार चालु करता येणार नाहीत. अकोला महानगरपालीका क्षेत्रातील मद्यविक्री अनुज्ञत्याबाबत स्वंतत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशांतील अटी शर्तींचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

......

Permission for sale of liquor excluding Akola Municipal Area from Wednesday

टिप्पण्या