corona virus news:चिंताजनक: अकोलाने गाठला २०७ आकडा;१२० रुग्णांवर उपचार सुरू

चिंताजनक: अकोलाने गाठला २०७ आकडा;१२० रुग्णांवर उपचार सुरू

 अकोला,दि.१४: आज दिवसभरात (सायंकाळी सहा वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे ११९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ९८ अहवाल निगेटीव्ह तर २१ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता  पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या अकोला जिल्ह्यातील व्यक्तींची एकूण संख्या २०७ झाली आहे. दरम्यान आज दिवसभरात १२ जणांना पूर्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजअखेर प्रत्यक्षात १२० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण २२४८ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १९८४ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण १७७७ अहवाल निगेटीव्ह तर २०७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  २६४ अहवाल प्रलंबित आहेत.

आजपर्यंत एकूण २२४८ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे २०३९, फेरतपासणीचे १०६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०३ नमुने होते. आजपर्यंत एकूण १९८४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १७७५ तर फेरतपासणीचे १०६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०३ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या १७७७ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल २०७ आहेत. तर आजअखेर २६४ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

आज २१ पॉझिटिव्ह

आज दिवसभरात प्राप्त झालेल्या ११९ अहवालात ९८ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर २१ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या ११ रुग्णांपैकी दोन खैर मोहम्मद प्लॉट, दोन माळीपूरा, तसेच फिरदोस कॉलनी,आंबेडकर नगर,गव्ह.गोडावून खदान, गोकुळ कॉलनी, तारफ़ैल,खडकी, पोलीस क्वार्टर येथील रहिवासी आहेत. त्यात नऊ पुरुष आणि दोन महिला आहेत. तर सायंकाळी पॉझिटीव्ह आढळलेल्या १० रुग्णांपैकी चार महिला व सहा पुरुष असून त्यातील तिघे आंबेडकर नगर न्यू बसस्टॅण्डच्यामागे, तर  उर्वरित खदान, सिटी कोतवाली, माळीपुरा, फिरदौस कॉलनी, सिव्हील लाईन्स, मोमीन पुरा, नेहरू नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

१२ जणांना घरी सोडले

आज दिवसभरात उपचार पूर्ण झालेल्या १२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यातील पाच जण हे  फतेह चौक या भागातील रहिवासी आहेत. तर उर्वरीत तिघे खैर मोहम्मद प्लॉट व मेहरनगर डाबकी रोड,  नाहिदपुरा पिंजर, बैदपूरा, गुलजारपुरा येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत. त्यात सात महिला व पाच पुरुषांचा समावेश आहे.

१२० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु

आता सद्यस्थितीत  २०७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील १५ जण (एक आत्महत्या व १४ कोरोनामुळे) मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना, बुधवार दि.६ मे  रोजी एकास , मंगळवार दि.१२ मे रोजी ६० जणांना तर आज (गुरुवार दि.१४ रोजी) १२ जणांना असे तब्बल ७२ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १२० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान आजअखेर १९२३ प्रवासी आले आहेत. त्यापैकी १२१५ गृहअलगीकरणात व १२ संस्थागत अलगीकरणात असे १२२७ जण अलगीकरणात आहेत. तर ५५१ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे. तर १४५ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली

......



टिप्पण्या