- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डाबकी रोड परिसरात कोरोनाचा शिरकाव!
अकोला:आज सकाळी आढळलेल्या दोन्ही पॉझिटीव्ह महिला रुग्ण राधाकिसन प्लॉट व ताजनगर मधील होत्या. तर सायंकाळच्या अहवालातील दोन रुग्ण ज्यात एक सहा वर्षिय बालिका व २० वर्षीय युवती आहे त्या डाबकी रोड परिसरातील रहिवासी आहेत. उर्वरित दोन बैदपूऱ्यातील मयत महिला आहेत, ज्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्या काल (दि.५ रोजी मयत झाल्या होत्या) तर एक मयत स्थितीत दाखल दानाबाजार मधील व्यक्ती आहे. ज्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला. (या व्यतिरिक्त सकाळी उपचार घेतांना एकाचा मृत्यू झाला आहे.)एकंदर आज चार मृत्यू नोंदविण्यात आले आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
कोरोना अलर्ट*
*आज बुधवार दि.६ मे २०२० रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*
आज प्राप्त अहवाल (सकाळ व सायंकाळ)- १००
पॉझिटीव्ह-सात
निगेटीव्ह- ९३
सावध रहा,घरातच रहा!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा