- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
आज दिवसभरात 23 पॉझिटिव्ह!
*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*
*कोरोना अलर्ट* *(सुधारीत)*
*आज शनिवार दि.२३ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-१५३*
*पॉझिटीव्ह-२३*
*निगेटीव्ह-१३०*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या १६ रुग्णांपैकी नऊ महिला व सात पुरुष असून त्यात दोनजण फिरदोस कॉलनी, दोन जण लोहिया नगर खोलेश्वर येथील रहिवासी आहे. तर उर्वरित माळीपुरा, मोहम्मद अली रोड, नानकनगर निमवाडी, चांदखा प्लॉट वाशीम बायपास, गोरक्षण रोड मलकापूर, यमुना संकुल, श्रावगी प्लॉट, हरिहर पेठ, इकबाल कॉलनी मोहता मिल जवळ, मलकापूर, रेल्वे झोन रामदास पेठ, दसेरा नगर हरिहर पेठ येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
आज दुपारुन आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या आठही महिला आहेत. त्यातील दोघींना घरी सोडण्यात आले आहे. त्या दोघी फिरदौस कॉलनी व सुभाष चौक येथील रहिवासी आहेत. तर अन्य सहा महिलांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले असून त्या त दोघी जणी फिरदौस कॉलनी येथील तर अन्य रेवतीनगर, सुभाष चौक, माणिक टॉकीज जवळ, लोहिया नगर येथील रहिवासी आहेत.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-३७८*
*मयत-२३(२२+१),डिस्चार्ज-२१९*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा