Corona update:आज दिवसभरात 20 पॉझिटिव्ह!

आज दिवसभरात 20 पॉझिटिव्ह!


*जिल्हा माहिती कार्यालय,अकोला*

*कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि.२६ मे २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल-३१५*
*पॉझिटीव्ह-२०*
*निगेटीव्ह-२९५*

*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी दाखल सात जणांपैकी  सर्व पुरुष आहेत. त्यातील  पाच जण हे हरिहर पेठ  अकोला येथील रहिवासी आहेत तर  उर्वरित दोघे जण आंबेडकर नगर अकोट फैल व सबेरी मशिद अकोट फैल येथील रहिवासी आहेत. यात अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या एका मयत रुग्णाचा समावेश आहे.

आज सायंकाळी प्राप्त अहवालात दोन पुरुष रुग्ण मयत झाले आहेत. त्यातील एक सबेरी मशिद अकोट फैल येथील रहिवासी आहे. हा ७१ वर्षीय रुग्ण दि.२३ रोजी दाखल झाला होता. त्याचा मृत्यू दि.२४ रोजी झाला होता. त्याचा अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. तर अन्य रुग्ण हा ६६ वर्षीय आगरवेस जुनेशहर येथील रहिवासी आहे. हा रुग्ण  दि.१८ रोजी दाखल झाला होता.  त्याचा अहवाल दि.२२ रोजी आला होता. तर आज दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास उपचार घेतांना त्याचे निधन झाले.

तर आज दुपारी  ३८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील ३६ जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले तर उर्वरित दोघांना घरी सोडण्यात आले.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-४३५*
*मयत-२८(२७+१),डिस्चार्ज-२८९*
*दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या