अकोल्यात कोरोना रुग्णांची भर; २पॉझिटिव्ह

अकोल्यात कोरोना रुग्णांची भर; २पॉझिटिव्ह
अकोला दि २८:अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून,नागरिकांनी आता अधिक दक्षता बाळगण्याची गरज आहे. आज मंगळवार रोजी २कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. दोघेही सिंधी कॅम्प मधील रुग्णाच्या संपर्कातील आहे. एक त्यांची पत्नी आणि दुसरा त्यांच्या दुकानात काम करणारा मुलगा आहे.हा मुलगा न्यू भीमनगर येथील रहिवासी असल्याचे कळते.
कोरोना अलर्ट
आज मंगळवार दि.२८ एप्रिल २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,
आज प्राप्त अहवाल- ४२
पॉझिटीव्ह- तीन
निगेटीव्ह- ३९
पॉझिटिव्ह अहवालात एक महिला असून ती सिंधी कॅम्प भागातील रुग्णाची पत्नी आहे. तर दुसरा रुग्ण हा त्याचाच नोकर आहे. हा नोकर ३१ वर्षाचा असून तो न्यू भीमनगर येथील रहिवासी आहे.
तर तिसरा पॉझिटिव्ह अहवाल हा फेरतपासणीचा असून तो बैदपुरा येथील तीन वर्षीय बालक आहे.
आता एकूण पॉझिटिव्ह अहवालांची संख्या १९ झाली असून प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊ झाली आहे., अशी माहितीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
....

टिप्पण्या