- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
तीन गोवशांना कत्तलीसाठी नेतांना दोघांना अटक.करुन मुद्देमाल जप्त
अकोला: बाळापुर येथील आज सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय महामार्गावरील महेश नदीवरुन बाळापुरातील कासारखेड येथे अवैध कत्तलीसाठी नेत असतांना बाळापुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांनी हि कारवाई केली आहे.
बाळापुर येथील राष्ट्रीय महामार्गावरुन महेश नदीचा पुलावरुन कासारखेड येथे तीन गोवंशाना कत्तलीसाठी नेत असतांना जुबेर अहेमद अब्दुल निसार दुसरा आरोपी शारुख अहेमद शेख कालु रा.दोन्ही कासारखेड येथील असुन यांना बाळापुर पोलीस उपविभागीय अधिकारी डाँ रोहीणी सोळंखे ठाणेदार नितीन शिंदे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर लांडे यांनी ही कारवाई केली.तसेच जनावराना निर्दयीपणे कत्तलीसाठी घेवुन जाताना वरील दोन्ही आरोपी विरुध्द महाराष्ट्र प्राणी सरंक्षण कायद्यानुसार गुन्हा नोंदवून दोघांनाही अटक केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा