मोठ्या राम मंदिरातील जन्मोत्सव कार्यक्रम होतील साध्या पध्दतीने

मोठ्या राम मंदिरातील जन्मोत्सव कार्यक्रम होतील साध्या पध्दतीने साजरे
गर्दी टाळण्यासाठी यंदा शोभायात्रा निघणार नाही

अकोला:श्री रामनवमी शोभायात्रा समिती व श्री जानकी वल्लभ मातृशक्ती जागरण सत्संग मंडळ शासनाच्या निर्णयाचे तंतोतंत पालन करून, जनतेमध्ये करोना विषाणू    संदर्भात जनजागृती करीत आहे.
 कोणत्याही कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ नये, यासाठी समाजातील सर्व घटकांशी जनसंपर्क करण्याचा निर्णय श्री रामनवमी शोभायात्रा समितीने घेतला आहे.  टिळक रोड वरील मोठ्या राममंदिर मधेय यंदा सर्व कार्यक्रम सध्या पध्दतीने पार पडतील.
नववर्ष घरोघरी साजरा करावा
वेगवेगळ्या माध्यमातून शासनाचे आदेश व कोरोना पृष्ठभूमि लक्षात घेता व धार्मिक परंपरा संस्कृती जनभावना भक्ती या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री रामनवमी शोभायात्रा समितीने नववर्ष 25 मार्च रोजी प्रत्येकाने आपल्या घरोघरी भगवा ध्वज व संध्याकाळी दीप प्रज्वलित करून सण साजरा करावा.

मूर्ती वितरण
 रामनवमी शोभायात्रा समितीच्यावतीने अकोला पंचक्रोशी मध्ये अनुष्ठान विग्रह मूर्ती वितरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आला होता घरोघरी किंवा हॉलमध्ये छोटेखानी कार्यक्रम घेऊन त्यामध्ये दहापेक्षा पेक्षा कमी फक्त जमा होतील अशी व्यवस्था करून क्रमबद्ध वितरण करण्याचा ठिकाणी करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे. यासंबंधी 22 मार्च रविवार रोजी मोठ्या राम मंदिरात निवडक ठिकाणी मूर्ती वितरण केंद्र साठी मूर्ती वितरण करण्याचा कार्यक्रम आमदार गोवर्धन शर्मा विलास अनासाने  अशोक गुप्ता ब्रिजमोहन चीतलांगे डॉक्टर अभय जैन यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता  करण्यात येणार आहे.

गणगौर विसर्जन मिरवणूक रद्द

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी िवविध स्तरावर उपाय याेजना करण्यात येत असून, गणगाैर विसर्जन मिरवणूक रद्द करण्यात अाली अाहे. हा िनर्णय गणगाैर उत्सव समितीने घेतला अाहे. गणगाैर विसर्जन मिरवणूक २७ मार्च राेजी निघाणार हाेती. जैन मंिदरापासून सुरु हाेणारी मिरवणूक गांधी राेड, महाराणा प्रताप चाैक (सिटी काेतवाली ), खाेलेश्वर, संताेषी माता मंदिरानजीकच्या घाटावर विसर्जित हाेणार हाेती.  मात्र यंदा घाटावर व्यवस्था हाेणार नसून, महिला भाविकांना िवसर्जनासाठी अापअापल्या स्तरावर व्यवस्था करावी लागणार अाहे.

मोठ्या राममंदिर मधील कार्यक्रम साध्या पध्दतीने
संत गजानन महाराज यांच्या पावन स्पर्शाने पवित्र अकोला शहरातील शताब्दी पूर्व मोठ्या राम मंदिर च्या वतीने रामनवमी निमित्त गुढीपाडव्यापासून पौर्णिमा पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात कोरोना च्या पार्श्वभूमीवर रद्द करून केवळ नियमित पूजा-अर्चना अभिषेक कार्यक्रम होणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ  सुमन देवी अग्रवाल व
विनायक गुरुजी शांडिल्य यांनी दिली आहे
राम नवमीच्या पर्वावर मोठ्या राम मंदिरासमोर भव्य मंडप टाकून रोज संध्याकाळी प्रवचन कीर्तन चा कार्यक्रम होत असते तो रद्द करण्यात आला आहे तसेच मंदिरात गर्दी होऊ नये यासाठी  चार दरवाजेच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे मंदिरात वीस च्या आत भाविक भरणार यासंदर्भात खबरदारी संस्थेच्या वतीने घेण्यात येणार आहे प्रवचन व किर्तनाला मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येतात तसेच रामनवमीच्या दिवशी दुपारी बारा वाजता राम जन्माच्या वेळी सुद्धा मंदिरासमोर प्रवचन किर्तन करण्यात येते तोसुद्धा रद्द करण्यात आला आहे तसेच रामनवमीच्या पर्वावर गुढीपाडव्यापासून महाप्रसाद असा कार्यक्रम सुद्धा करण्यात येऊन वेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात येते तोसुद्धा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी अशी विनंती श्रीराम व हरिहर संस्था च्या वतीने करण्यात आली आहे
आता मंदिरात सकाळी होणारी आरती व अभिषेक कार्यक्रम होणार. तर उत्सवानिमित्त होणारी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
तसेच मंदिरासमोर मंडप सुद्धा टाकण्यात येणार नाही व कोणतेही वाजागाजा न करता साध्या पद्धतीने  उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
शोभायात्रा निघणार नाही
श्रीराम नवमी शोभा यात्रा समिती 2020
देशातील परिस्थिती पाहता यावर्षी, अकोला येथील निघनारी श्रीराम नवमी शोभा यात्रा दि.2 एप्रिल रोजी निघणार नाही. असा निर्णय समिती ने घेतला आहे. तेंव्हा दिंडी, झाकीचे फाॅर्म कोणी ही भरू नये, व आणून देवू नये. आप आपल्या भागात घरोघरी श्रीराम ऊत्सव  करावा. 

टिप्पण्या