ग्लोबल ड्रॉइंग ऑलिम्पियाड स्पर्धेत आर्या भट सुवर्णपदकाची मानकरी

ग्लोबल एलकेजी ड्रॉइंग ऑलिम्पियाड स्पर्धेत आर्या भट सुवर्णपदकाची मानकरी 
अकोला: ग्लोबल एल्केजी ड्रॉईंग ओलंपियाड 2019 20 या स्पर्धेत होलीक्रॉस कॉन्व्हेंट ची विद्यार्थिनी आर्या असिम भट हिने पहिल्या रँक मध्ये पात्र ठरत सुवर्णपदक पटकाविले.तर राज्यात आर्या दुसरी पात्र स्पर्धक ठरली .होलीक्रॉस प्री प्रायमरी  स्कूलच्या प्राचार्य सिस्टर लिली यांच्या हस्ते, संस्थेच्या वतीने तिला गौरविण्यात आले .त्याचप्रमाणे हस्ताक्षर स्पर्धेतही आर्या वर्गातून प्रथम आल्यामुळे तिला भेटवस्तू प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे नर्सरी स्कूलमध्येही तिने गतवर्षी रौप्यपदक पटकाविले. वर्ग शिक्षिका कविता मानवटकर आणि शुभांगी यांच्या मार्गदर्शनात तिने हे यश संपादन केले

टिप्पण्या