21 दिवसांच्या कर्फ्यूच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत राहील

21 दिवसांच्या कर्फ्यूच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरुपी सुरळीत राहील
_घाबरू नका, काळजी घ्या_

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 अकोला, दि.२४: कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसाचा कर्फ्यू जाहीर केला आहे. *_या काळात सर्व जीवनावश्यक सेवा सुरळीत सुरू राहतील_*. घाबरू नये, दक्षता घ्यावी, असे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले आहे .

राज्यात लागू असलेल्या कलम 144 च्या अधिसूचनेत नमूद केलेल्या बाबी तशाच सुरु राहतील. *21 दिवसाच्या कर्फ्यूमुळे जीवनावश्यक बाबींच्या पुरवठ्यावर , जीवनावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.* याबाबत सर्व जनतेला आश्‍वस्त करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

त्यामुळे कृपया कोणीही पॅनिक होऊ नये. सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी .घरातच  राहावे .घराबाहेर कृपया पडू नये . _कोरोनाबरोबर आपली ही अत्यंत महत्त्वाची लढाई सुरू असून सर्व जनतेने संयमाने या परिस्थितीत सहकार्य द्यावे,_ असे आवाहन  सर्वांना करण्यात आले आहे



             

टिप्पण्या