राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत अकोला संघाने मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.

46 वि  ज्युनिअर  राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत अकोला संघाने मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.
  अकोला: 46 वि ज्युनिअर राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा कारंजा जिल्हा वाशीम येथे दि. 31/1ते 2/2/2020ला आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धे मध्ये अकोला जिल्हा संघाने झोन मध्ये नागपूर भंडारा संघाला धूळ चारत उपांत्य फेरी गाठली. बुलढाणा संघाचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. अंतिम सामन्यात अमरावती विरुद्ध कु. प्रतिज्ञा तेलगोटे, प्रगती इंगळे, पायल श्रीनाथ, साक्षी धुळे यांच्या भारदस्त चढाई व पकडी मुळे अमरावती संघाचा 9गुणांनी पराजय करून प्रथम क्रमांक पटकाविला. अकोला संघाला प्रथम पारितोषिक म्हणून भव्य ट्रॉफी मिळाली. 
 संघांचे मार्गदर्शक वासुदेवराव नेरकर जिल्हा सचिव. मॅनेजर सौ. भारती वावगे,    प्रशिक्षक गजानन इंगळे. 13/2/2020ते 16/2/2020पर्यंत हरियाणा येथे होत असलेल्या ज्युनिअर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता विदर्भ संघात अकोला जिल्ह्याचे तीन खेळाडू कु. पायल श्रीनाथ, साक्षी धुळे, प्रतिज्ञा तेलगोटे यांची निवड करण्यात आली. खामगांव येथे सरावा करिता हे खेळाडू रवाना झाले. आणि जिल्हा संघटनेचे अध्यक्ष गुलाबरावजी गावंडे माजी राज्य मंत्री व मा. आमदार गजाननराव दालू गुरुजी व जिल्ह्यातील असंख्य खेळाडूंनी यांचे कौतुक केले आणि पुढील यशाकरिता शुभेच्छा दिल्या.           

टिप्पण्या