इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या मानद सचिवपदी प्रभाजीत बछेर यांची सातव्यांदा फेरनिवड

इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या मानद सचिवपदी प्रभाजीत बछेर यांची सातव्यांदा फेरनिवड
अकोला:इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या अकोला जिल्हा शाखेच्या मानद सचिवपदी प्रभजित सिंह बछेर यांची सातव्यांदा फेर निवड झाली आहे.
संस्थेची वार्षिक आमसभा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष श्री जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली संस्थेचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर किशोर मालोकार कनिष्ठ उपाध्यक्ष श्री अमर गौड आणि कोषाध्यक्षपदी एडवोकेट महेंद्र साहू यांची सर्वानुमते फेर निवड झाली 
नवनियुक्त कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी एक मताने उपरोक्त चार पदाधिकाऱ्यांची निवड करावी असे पत्र माननीय अध्यक्ष यांना सादर केले आणि संस्थेतील या एकोप्याचे जिल्हाधिकारी महोदय यांनी कौतुक केले उपरोक्त चार जणाशिवाय सीए मनोज चांडक, अरुंधती ताई शिरसाट, एडवोकेट सुभाषसिंह ठाकूर, एडवोकेट सुभाष मुंगी,  प्रशांत राठी याआधीच्या कार्यकारी सदस्यांची महाराष्ट्र शाखेने फेर नियुक्ती केली आहे
 याआधी मावळत्या कार्यकारिणीने एक मताने डॉक्टर एन के माहेश्वरी, डॉक्टर तजिन सय्यद, सुरेश भाई वोरा, प्राध्यापक राजाभाऊ देशमुख, गिरीश घिया, सूर्यकांत उर्फ राजू बुडखुले, डॉक्टर उज्ज्वल कराळे, व पंकज राठी यांच्या नावाची शिफारस केली होती व त्यांची नवीन कार्यकारिणी वर निवड झाली आहे.

टिप्पण्या