अमरावतीची ' पारो ' एकांकिका सर्वोत्कृष्ट

अमरावतीची ' पारो ' एकांकिका सर्वोत्कृष्ट
लक्ष्मणराव देशपांडे स्मृती एकांकिका स्पर्धा- २०२०

अकोला: उत्कृष्ठ अभिनय अन दिगदर्शनाने नटलेल्या अमरावती शाखेची
' पारो ' ही एकांकिका कै .लक्ष्मणराव देशपांडे स्मृती एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ठ ठरली. मुंबई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी या एकांकिकेची निवड करण्यात आली.तर द्वितीय स्थान अकोला शाखेच्या ' लास्ट प्ले ' या एकांकिकेने पटकावला.
           अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद , मुंबईद्वारा आयोजित आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद , अकोला शाखा तथा मलकापूर - अकोला शाखा व श्री शिवाजी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने संयोजनात शनिवार दि. 22 फेब्रुवारी रोजी श्री .शिवाजी महाविद्यालयाच्या वसंत सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षक मंगेश नेहरे ( मुंबई ) , डॉ . गणेश शिंदे ( औरंगाबाद ) यांच्या हस्ते नटराज पूजन व दीप प्रज्ज्वलन करून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले . प्रसंगी मुंबई केंद्रीय शाखेचे सहसचिव अशोक ढेरे , मलकापूर- अकोला शाखेचे अध्यक्ष प्रा . मधू जाधव , अकोला शाखेचे कार्यवाह अनिल कुलकर्णी उपस्थित होते. 
         अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद, अमरावती शाखेने सादर केलेली ' पारो ' ही एकांकिका प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली. सोबतच याच एकांकिकेच्या दिगदर्शनासाठी वैभव देशमुख प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले. तर अकोला शाखेने सादर केलेल्या ' लास्ट प्ले ' द्वितीय ठरली . दिगदर्शनचा द्वितीय पुरस्कार अनिल कुलकर्णी मिळाला.
सर्वोत्कृष्ठ अभिनयासाठी पुरुष गटात प्रथम क्रमांक- अभिषेक खेडकर ( ' लाल सलाम '  , कारंजा शाखा), द्वितीय - मिलिंद कुलकर्णी ( ' लास्ट प्ले ' अकोला शाखा ) तर उत्तेजनार्थ - अनिल कुलकर्णी यांना मिळाला. सर्वोत्कृष्ठ अभिनय महिला गटात प्रथम क्रमांक - वैष्णवी बडगे ( पारो ) , द्वितीय - गिरीजा पातूरकर( पारो ) तर उत्तेजनार्थ - दिव्या स्थूल ( पारो ) यांनी पटकावला .

टिप्पण्या