तीनशे रुग्णांनी घेतला रा.काँ. अल्पसंख्यच्या आरोग्य शिबिराचा लाभ

तीनशे रुग्णांनी घेतला रा.काँ. अल्पसंख्यच्या आरोग्य शिबिराचा लाभ
अकोला: राष्ट्रवादी राष्ट्रीय अल्पसंख्यांक विभाग तथा ओजोन हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने रविवारी  स्थानिय केएमटी सभागृहात आयोजित मोफत आरोग्य शिबीराचा तब्बल  तीनशे रुग्णांनी लाभ घेतला.
राकां प्रदेश अध्यक्ष,तथा कैबिनेट मंत्री जयंतराव पाटिल यांच्या  जन्मदिनाचे  औचित्य साधून  आयोजित या शिबीरात डॉ आशीष गिरहे, डॉ राहुल सुरुशे, डॉ सिदधु पंजवानी, डॉ समीर देशमुख, डॉ. नाना पाटिल आदींनी रुग्ण तपासणी करून रुग्णांना मोफत औषधे व नंबरचे चष्मे वितरित करण्यात आलेत. रुग्णांच्या शस्त्रक्रियेची सोय ओझोन हॉस्पिटल मध्ये अल्पदरात करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 शिबीर प्रारंभ रा.काँ. नेते श्रीकांत पिसे पाटिल,डॉ.आशा मिरगे, पक्षाचे महानगर अध्यक्ष राजू मूलचंदानी,अल्पसंख्यक विभाग चे राष्ट्रीय महासचिव जावेद ज़कारिया,पूर्व नगरसेवक मो.फजलु, विजय उजवणे, नगरसेवक फैयाज खान,  नगरसेवक रहीम पेंटर,सालार खान,मोहम्मद साबिर,पापाचंद्र पवार,शेख आरिफ रबानी, शौकत अली आदींच्या उपस्थितीत केक केक कापून करण्यात आले.
मान्यवरानी अल्पसंख्यांक विभाग च्या या उपक्रमा चे कौतुक करीत शुभेच्छा प्रदान केल्यात.संचालन तथा आभार जावेद जकरिया यांनी केले.
यावेळी नागेश मेहरे,ज़ीशान खान, फ़ैज़ अली खान, सद्दाम खान, रज़ा खान, सलमान खान,गुड्डू खान,शाहरुख खान समवेत.   पदाधिकारी कार्यकर्ता गण, रुग्ण उपस्थित होते.

टिप्पण्या