अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महीला आघाडी बैठक

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद महीला आघाडी बैठक 
अकोला:अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या महीला आघाडी द्वारे आज अकोल्याच्या हनुमान ग्राम विकास प्रतिष्ठानच्या कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तथा समता परिषदेचे  महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रा तुकारामभाऊ बिडकर, 
महीला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष मंजिरीताई घाडगे ,समीर घाडगे ,गजाननभाऊ इंगळे विभागीय संघटक ,गजाननभाऊ म्हैसने अकोला जिल्हा कार्याध्यक्ष ,अरविंदजी गाभणे विभागीय अध्यक्ष ,प्रकाशजी राऊत, उमेशभाऊ मसने महानगर कार्याध्यक्ष ,रामदासजी खंडारे उज्वलाताई बोळे ,विभाताई बोळे ,किरणताई बिडकर नागपुर, कल्पना गवारगुरू ,लेकुरवाडे साहेब मोर्शी प्रामुख्याने उपस्थित होते .यावेळी दिवंगत जगन्नाथजी कोंडे यांना समता परिषदेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले .या आढावा बैठकीला बहुसंख्य महीला तथा पुरुष समता सैनिकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या