लोकनेते वसंतराव धोत्रे सामाजिक सेवा-कार्य पुरस्काराने दीपक सदाफळे सन्मानित

लोकनेते वसंतराव धोत्रे  सामाजिक सेवा-कार्य पुरस्काराने दीपक सदाफळे सन्मानित
अशाप्रकारचा आगवेगळा आदर्श निर्माण करणारा पुरस्कार माझ्या हातून दिला जाणारा हा पहीलाच पुरस्कार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मा.ना.डाॅ.राजेंद्र शिंगणे  यांनी (जिवरक्षक) दीपक सदाफळे यांना प्रदान करतांना म्हटले.

आपत्ती व्यवस्थापन आणी सामाजिक क्षेत्रात आपले जिवन अर्पित करणारे, (जिवरक्षक) दीपक सदाफळे हे स्व.वसंतराव धोत्रे सामाजिक सेवा कार्य पुरस्काराने सन्मानित

*14 फेब्रुवारी 2020 *
स्थळ-कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला

*अकोला* :- आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात हिरीरीने भाग घेऊन नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपात्कालीन घटनांमधुन आजपर्यंत हजारोंच्या संख्येने विविध संकटात सापडलेल्या लोकांना वाचविण्यासाठी आपल्या जिवाची बाजी लावुन वाचविले.तथा अनेक अशा सामाजिक कार्यासाठी कार्य करत.यशस्वीपणे जणजागृती विविध कार्यक्रमांचे माध्यमातून समाजपयोगी योगदानाचे उल्लेखनीय कार्य पाहुन यांच्या नाविन्यपूर्ण कामगिरी बद्दल अकोला कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती 
मा.श्री. शिरीषभाऊ धोत्रे आणी अकोला कृ.उ.बा.स. संचालक मंडळ  यांनी दखल घेऊन पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख. (जिवरक्षक) दीपक सदाफळे यांना.
 *2019--2020* यावर्षीच्या *लोकनेते  स्व.वसंतराव धोत्रे सामाजिक सेवा कार्य पुरस्कारासाठी सर्वानुमते निवड करुन. *14 फेब्रुवारी 2020 रोजी. कृ.उ.बा.स.अकोला येथे लोकनेते स्व.वसंतराव धोत्रे साहेब.* यांच्या *जयंती दिना निमित्त* आयोजित भव्य दिव्य अशा महोत्सवात. *दहा हजार रु.,शाल श्रीफळ,सन्मान चिन्ह,आणी सन्मानपत्र देऊन महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री, माननिय नामदार श्री.डाॅ.राजेंद्रजी शिंगणे साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला,आणी सन्मानित करण्यात आले.
* यावेळी व्यासपीठावर *दी.अकोला जि.म.को-ऑ.बँक ली.अकोला चे अध्यक्ष मा.डाॅ.श्री.संतोषदादा कोरपे,मा.आ.श्री.रणधीरभाऊ सावरकर,मा.आ.श्री.गोवर्धनजी शर्मा,कृ.बा.स.अकोला चे सभापती मा.श्री.शिरीषभाऊ धोत्रे, उप-स.निळकंठराव खेडकर, रा.काॅ.पा.जि.अ.श्री.संग्रामभैय्या गावंडे,श्री. श्रीकांतदादा पिसे,* *आणी कृ.उ.बा.स.चे सर्व मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.* *यावेळी कृ.उ.बा.स.चे सर्व कार्यकारी मंडळी* आणी *कर्मचारी, व कामगार आणि शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.* यावेळी दीपक सदाफळे यांनी आपल्या मनोगतातुन म्हटले की आजचा *कृ.उ.बा.स.चा लोकनेते स्व.वसंतराव धोत्रे सामाजिक सेवा कार्य पुरस्कार* 
 मला मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी कृ.उ.बा.स.अकोला तसेच शेतकरी बांधवांची ही अविस्मरणीय भेट असुन ही माझ्या हृदयात सदैव तेवत राहील. यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे.असे भावनिक उद्गार दीपक सदाफळे यांनी काढले आणी सर्वांचे आभार मानले.

टिप्पण्या