अन तिला आणले मृत्यूच्या दारातून खेचून

 अन तिला आणले मृत्यूच्या दारातून खेचून
एक तास जीवन-मरणाचा संघर्ष!

दीपक सदाफळे यांनी वाचविले महिलेचे प्राण


फासी घेतलेल्या महीलेला मृत्यूच्या दारातुन अक्षरशः खेचुन आणण्यासाठी (जिवरक्षक) दीपक सदाफळे यांची समयसुचकता आणी सतर्कतासह पिंजर ते अकोला पर्यंत त्या महीलेला मदतीसाठी केलेला एक तासाचा "संघर्ष" हा त्या महीलेला आणी परीवारासाठी एक वरदान ठरला.
सदर महीला ही 27 वर्षाची असुन तीला एक वर्षाची मुलगी आहे हे विषेश
चक्क बेशुद्ध अवस्थेत  असलेल्या व कुठलाही प्रतिसाद न देणा-या महिलेला पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रापासुन ते अकोला येथे नेत असतांना जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी *C.P.R.* *देत आणी आपल्या प्रदीर्घ अनुभवानुसार प्रथमोपचार देत शेवटी बार्शीटाकळी पर्यंत काहीप्रमाणावर शुद्धीवर  आणलेच.नंतर मोठया प्रमाणावर झटके सुरुझाले परंतु डोळे बंद आणी झटक्याची त्रीवता ऐवढी वाढली होती की गाडी मधील नातेवाईक मामी व सासु  आणी आतेभाऊ व असे चौघांनाही आवरने कठीण होत होते. तरी व्यवस्थीत कुठलीही ईजा होऊ न देता त्या महीलेला (सेफ) पोजीशन मध्ये नेत नेत अकोला जिल्हा रुग्णालयात पोहचविले.
त्या महिलेच्या परिवारातील जिवरक्षक दीपक सदाफळे पिंजर यांचा प्रत्यक्ष अनुभवला एक तासाचा संघर्ष.

 *जिवरक्षक* *दीपक सदाफळे पिंजर यांच्या 18 वर्षाच्या आपात्कालीन घटनांमध्ये मिळत असलेल्या मदतीच्या दीर्घ अनुभवातून मिळत आहे अनेकांना जिवनदान.
 अशी घडली घटना
  जि.प.पं.स. निवडणुका काळात मागच्या काही दीवस आधी फुकाची मिळालेली दारु ढोसल्याने आणी आता तुंम्ही बाहेर जाऊ नका नाहीतर लोकं आणखी दारु पाजतील कारण पतीचा चांगला असलेला स्वभाव असल्याने पत्नी घाबरली होती. परंतु पतीने घरातील टीव्ही वैगरे फोडली आणी यामुळे या महीलेने आपल्या पतीच्या जाचाला कंटाळुन राहत्या घरातच गळफास घेतला एवढयातच बाहेर असलेले तीचे सासरे आत्या आणी मामी धावत आली आणी लगेचच सास-यांनी मामीने आत्याने खाली उतरविले यावेळी ती पुर्णपणे बेशुद्ध पडली होती. कुठलाही  प्रतिसाद देत नसल्याने निवडुनक निमित्त महान येथील शरद जंगले हे या गावात आले होते. यावेळी भेंडी महाल येथे गाडी नसल्याने योगायोगाने   शरद जंगले हे हजर असल्याने गावातील मनिष देशमुख यांनी लगेच शरद जंगले यांना फोनवरून घटनास्थळी बोलावले आणी पिंजर येथे नेण्यासाठी विनंती केली.आणी लगेच शरद जंगले यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख, दीपक सदाफळे पिंजर यांना माहिती दीली तेव्हा दीपक सदाफळे यांनी लोकेशन  घेतले तेव्हा त्या महिलेला रिकव्हरी पोजीशन मध्ये ठेऊन आणा. मी तोपर्यंत प्रा.आ.कें.पोहचतो लगेच दीपक सदाफळे हे प्रा.आ.केंद्रात दाखल झाले आणी वैद्यकीय अ.डाॅ.कुळकर्णी साहेबांना माहिती दीली आणी पेशंट पोहचेपर्यंत (102) गाडीसह सर्व तयारी रेडी होती. लगेच पाच मिनिटातच पेशंट घेऊन गाडी दाखल झाली आणी डाॅक्टरांनी तपासणी केली तेंव्हा कुठलाही प्रतिसाद पेशंट देत नसल्याने लगेच पढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले. लगेच  प्रा.आ.केंद्राच्या (102) गाडीने पेशंटसह नातेवाईक आणी जिवरक्षक 
दीपक सदाफळे हे अकोला करीता रवाना झाले.लगेच *जिवरक्षक* दीपक सदाफळे पिंजर यांनी गळ्याजवळील *केरोटीन पल्स* *चेक केली तेव्हा ती  प्रेझेंट असल्याचे लक्षात येताच गाडीतील घरचे नातेवाईकांना दीपक सदाफळे यांनी पेशंटला *CPR* *देण्यासाठी  परवानगी मांगीतली लगेच पेशंटची मामी आणी आत्या व सासरे यांनी होकार दीला.* काहीही करा पण आमच्या मुलीला बोलायला व डोळे उघडायला लावा अशी विनवणी ते रडत तडत करत होते. आणी लगेचच दीपक सदाफळे यांनी आपल्यामध्ये असलेल्या अनुभवानुसार *CPR* सिस्टम देणे चालुकेले तेव्हा दोन स्टेप झाल्यावरही पेशंटची कुठलीही हालचाल नव्हती परंतु हीच स्टेप कंटीनिव्ह चालुच ठेवली आणी शेवटी साहाव्या स्टेपला पेशंटने रीसपाॅन्स दीला आणी हालचाल चालु झाली. *तेव्हा गाडीतील नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला आणी मायी लेक हायना बापा असा आवाज काढला* आणी यापुढे जोराजोराने झटके सुरुझाले तेव्हा पुन्हा पेशंटला रिकव्हरी पोजिशन वर ठेऊन व्यवस्थीत सेफ मध्ये अकोला जिल्हा रुग्णालय गाठले तेव्हा तेथील डाॅक्टरांना दीपक सदाफळे यांनी संपुर्ण हकीकत सांगितली तेव्हा तेथील डाॅक्टरांनी उपचार सुरू केले. आणी लगेचच अपघात कक्षातून *ICU* मध्ये हलविले  तीन-चार दीवस येथे भरती ठेवले आणी नंतर सुटी देऊन घरी पाठविले आता पेशंट आपल्याघरी एकदम सुखरूप असुन दोघेही पतीपत्नी सुखरुप नांदत आहेत.यामधे पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ.पद्मनाभ कुळकर्णी यांनी ऐनवेळी (108) ऑफलाईन असल्याने आपली (102) गाडी चालक अशोक थोरात यांना पाठविले,सोबत भेंडी महालचे नारायण सोनोने (मिस्त्री) यांनी सहकार्य केले. यामध्ये शरद जंगले महान यांनी वेळीच आपल्या वाहतुन पिंजर येथे आणण्यासाठी सहकार्य केले. मनिष देशमुख यांनी सर्वप्रथम  फोनवरून माहीती देऊन सहकार्य केले. यामुळे योग्य वेळी योग्य मदत मिळाली आमी त्या महिलेला जिवनदान मिळाले. परीवारासह भेंडी महाल गावातील आणी परिसरात जिवरक्षक दीपक सदाफळे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी दीपक सदाफळे यांनी सांगितले की आमच्या सेवेतील फाशी बाबतची ही यशस्वीपणे पार पडलेली ही तीसरी घटना आहे. मात्र वेळीच माहिती जर आंम्हाला मिळाली तरच हे शक्यतो योग्य होऊ शकते. परंतु अशा क्रीटीकल सिचवेशन मध्ये  भरिव यश आले तर अशावेळी  वेगळेच समाधान होते, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी यावेळी दिली.

टिप्पण्या