- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
चीन मधून परतले अकोल्यातील 2 विध्यार्थी!
अकोला : अकोला येथील चीनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी सुखरूप मायदेशी परतले पालक वर्गात आनंदी वातावरण चीनमध्ये करोना विषाणूच्या उद्रेकाने संसर्ग होऊन मानवी आरोग्य धोक्यात आल्याच्या पार्श्वभुमीवर जागतीक आरोग्य संघटनेने ‘’जागतीक आरोग्य आणीबाणी’’ जाहीर केली आहे. भारत सरकारने चीन मधून विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. चीनमधील वेनझाऊ विद्यापीठात एम.बी.बी.एस.पदवी शिक्षण घेत असलेला अकोला येथील घरी सुखरूप पोहचले. वेनझाऊ मेडिकल विद्यापीठात महाराष्ट्रातील सुमारे ४० विद्यार्थीनी वैद्यकीय शिक्षण घेत असून सर्व विद्यापीठा मिळून अकोल्यातील सुमारे१८ ते २० विद्यार्थी चीन येथे शिक्षण घेतात अशी माहिती मंथन पाटील या विद्यार्थ्यांनी दिली. करोना व्हायरसमुळे विद्यार्थी बाधीत होऊ नये म्हणून चीन सरकारने सर्व विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याच्या सुचना केल्या चीन बाहेर जाणा-या विद्यार्थ्यांची विमानतळावर तसेच आगमन होत असलेल्या भारतीय विमानतळावर आरोग्य तपासणी करण्यात आली. करोना व्हायरसची बाधा होऊ नये म्हणून जगभर काळजी घेण्यात येत असून तशा सतर्कतेच्या सुचना देण्यात आल्या आहेत. साधारणपणे प्राथमिक खबरदारी म्हणून नाका तोंडाला मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी कमी वावर करणे, हात स्वच्छ धुने, सॅनिटायझरचा वापर करणे इत्यादि किमान काळजी घेणे आवश्यक आहे.
केंद्रीय राज्यमंत्री ना. संजूभाऊ धोत्रे यांनी अकोला जिल्ह्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातील व विदर्भातील विद्यार्थ्यां संदर्भात परराष्ट्र मंत्री ना. जयशंकर यांची भेट घेऊन विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा विनिमय करून विद्यार्थी तसेच विदर्भातील राहणाऱ्या नागरिकांना सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासंबंधी निर्देश देऊन संपूर्ण माहिती घेतली होती व त्या संदर्भात त्यांनी सर्व विदर्भातील मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक सह सुखरूप येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये संभाव्य करोना व्हायरस ग्रस्त रूग्णांसाठी विशेष उपचार कक्ष सुरू करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाला निर्गमीत केलेल्या सुचनांप्रमाणे महाविद्यालयाने विशेष कक्ष सुरू केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा