- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोला: नागरी आरोग्य केंद्र अशोकनगर तर्फे आयुर्वेदिक रुग्णालय अशोक नगर अकोट फैल इथं भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर फारुखी खान यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी डॉक्टर महेंद्र मोहिते एसीएस जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला हे होते. शिबिराला तज्ञ डॉक्टरांची उपस्थिती असल्याने स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्त्री रोगतज्ञ डॉ. पुनम मोहिते, बालरोग तज्ञ डॉ. मोहसीन खान, जनरल फिजिशियन डॉक्टर सदावर्ते यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाला डॉ. मसलीहोद्दीन, डॉक्टर राजीक, डॉक्टर वासीकुअली उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर सुचिता मोहिते इन्चार्ज नागरी आरोग्य केंद्र अशोक नगर अकोला यांनी केले होते. कार्यक्रमाला सर्व आशा, आरोग्य कर्मचारी श्रीमती देशमुख, श्रीमती मसागर, श्रीमती गावंडे, श्री खोपे, श्रीमती चावरे, श्रीमती वरघट, संजय अग्रवाल, श्री अटंबर, श्री खंडारे, श्री तायडे, श्री जयस्वाल, यांनी मोलाची भूमिका बजावली. यावेळी स्थानिक नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा