माजी गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या 'गृहमंत्री' ठरल्या पहिल्या धावपटू

माजी गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या 'गृहमंत्री' ठरल्या पहिल्या धावपटू!
अकोला: अकोल्याच्या पिंकेथाॕन अँबेसॕडर व महाराष्ट्राचे माजी गृह राज्यमंञी डॉ. रणजीत पाटील यांच्या सहधर्मचारिणी 
डॉक्टर अपर्णा रणजीत पाटील यांनी १९ जानेवारीला  टाटा मुंबई  पूर्ण  मॕरेथाॕन लक्ष्य ४२ किलोमीटर अंतर पूर्ण करुन स्वतःची यशस्वी  मॕरेथाॕनर  म्हणून वेगळी ओळख निर्माण केली. यासोबतच त्या अकोल्यातील पहिल्या पूर्ण मॅरेथॉन अंतर पार करणाऱ्या महिला धावपटू ठरल्या.
 या वाटचालीस त्यांनी पिंकेथाॕन अकोलामध्ये १०० मीटर धाऊन  एप्रिल २०१८ ला श्रीगणेशा केला. मात्र त्यानंतर मागे वळून पाहीले नाही. अकोला आय एम ए. आयोजित  स्पर्धेत त्या प्रथम होत्या .डिसेंबर 2018ला पिंकेथाॕन अर्ध मॕरेथाॕनचा पल्ला पार करुन जानेवारी 2019 मध्ये टाटा अर्ध मॕरेथाॕन पूर्ण केली.आत्मविश्वास वाढला. प्रोत्साहन देऊन शास्ञशुद्ध  मार्गदर्शकाच्या भूमिकेत होत्या आणि आहेत त्यांच्या जीवश्च कंठस्य सखी  क्रांती साळवी.
पुढे कन्येच्या लग्न  सोहळ्याच्या  गडबडीत  पाच - सहा महिने धावण्याचा सराव संपूर्ण  बंद होता.पण  नंतर पुनश्च त्यांनी  सरावाची शुन्यापासून सुरुवात केली.जून  मध्येच  टाटा  मुंबई  पूर्ण मॕरेथाॕन  2020 साठी रजिस्ट्रेशन केले.
प्रत्येक क्रिडाप्रकाराचे एक तंञ असते. धावण्यातील कौशल्या विकसित व्हावे म्हणुन शिस्तबद्ध  एक्झरसाईजचे मार्गदर्शन  डॕनिअल यांनी केले.
डॉ.अपर्णा पाटील यांनी सातारा हील ही धावपटुंच स्वप्न असलेली अर्ध मॕरेथाॕन पूर्ण करुन टार ब्लेझर्स व जागतिक प्रतिष्ठेची  नेव्ही अर्ध मॕरेथाॕनही वेगावर वर्चस्व प्राप्त करुन त्यांच्या वयोगटात चवथा क्रमांक मिळविला. 
डॉ.अपर्णा पाटील यांच्या यशात त्यांची जिद्द,जागृती , सातत्य व परिश्रम तर आहेतच पण मोलाचे आहे कुटुंबाचे सहकार्य. त्या बाबतीत बोलतांना त्या म्हणाल्या की " मी अनेक अर्ध मॕरेथाॕन व पूर्ण टाटा मॕरेथान  पूर्ण करु शकले याचे श्रेय माझा परिवार,  विशेषतः माझे पती डॉक्टर रणजीत पाटलांचे आहे. त्यांच्या  व्यस्त दिनक्रमातही त्यांनी मला प्रोत्साहित केले. गैरसोय सहन केली.  " त्यांनी आपले यशाचे इनस्पायरेशन मेडलही डॉ. रणजित पाटील यांना समर्पित केले.

टिप्पण्या