teachers-constituency-election: शिक्षकांच्या समस्यांची जाण असणाऱ्या किरण सरनाईक यांना प्रचंड मतांनी विजयी करा - पालकमंत्री आकाश फुंडकर यांचे आवाहन
राजकीय, सामाजिक जाण असणारा अभ्यासू नेता किरण सरनाईकच - आ. रणधीर सावरकर
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला :शिक्षक हा दिशादर्शक आणि देश निर्माण करणाऱ्या पिढीला मार्गदर्शक असून, शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्याची आणि निराकरण करण्याची ताकद महायुतीमध्ये असून, अभ्यासू आणि शिक्षकांच्या समस्यांची जाण असणारे उमेदवार आमदार किरण सरनाईक यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी केले.
स्थानिक सुखकर्ता लॉन येथे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे शिक्षक मतदार संघातील उमेदवार किरण सरनाईक यांच्या आशीर्वाद सहविचार सभेत ते बोलत होते.
आमदार रणधीर सावरकर म्हणाले -
आमदार रणधीर सावरकर मार्गदर्शन करताना
राजकीय, सामाजिक आणि मानवतेचा विचार करून किरण सरनाईक यांच्या पाठीशी उभे रहा. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक समस्यांची जाण असणारे, अभ्यासू नेतृत्व, दूरदृष्टी ठेवून कार्य करणारे, शिक्षण क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहणारे, सतत संपर्क ठेवणारे, कोणत्याही कामात अडथळा निर्माण न करणारे, सर्वांशी एकरूप राहणारे लोकप्रतिनिधी म्हणून अमरावती शिक्षक मतदार संघातून किरण सरनाईक हे योग्य उमेदवार असून, त्यांच्या 3 नंबरच्या नावासमोर 1 क्रमांक लिहून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
सध्याची राजकीय परिस्थिती, देशाची परिस्थिती आणि काम करण्याची, विकास करण्याची दूरदृष्टी ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्राताई पवार यांच्या पाठीशी उभे रहा. महाराष्ट्राच्या विकासाला गती थांबवणारे काँग्रेस आणि त्यांचे सहकारी पक्षांना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आहे. देशभरात जात-पात, धर्म विसरून सर्वजण पंतप्रधान मोदींच्या पाठीशी उभे आहेत.
आज जामिनावर असणारे आरोपी सुप्रीम कोर्टाच्या जजला भेटून निवेदन देण्याची गोष्ट करत आहेत. लोकशाहीमध्ये पथ्य पाळण्यापेक्षा दबावाचे राजकारण, 'हम करे सो कायदा' या तत्त्वापासून सावध राहण्याची गरज आहे. अराजकता निर्माण करणाऱ्या, केवळ आपल्या फायद्यासाठी वाटेल ते करणाऱ्या तत्त्वांपासून सावध राहा. महायुतीचा उमेदवार किरण सरनाईक हा प्रत्येक शिक्षकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, शिक्षण संस्थेच्या समस्या आणि शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या समस्या निकाली काढण्याची धमक असणारा नेता आहे. राज्यात आणि केंद्रात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार असल्यामुळे या सरकारच्या पाठीशी उभे रहा.
खासदार अनुप धोत्रे म्हणाले -
खासदार अनुप धोत्रे यांनी विचार व्यक्त केले
अकोला जिल्ह्याच्या विकासासाठी विमानतळाचे काम अधिग्रहणाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, अकोला येथे पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू होत असून दुसरे प्रशिक्षण केंद्र सुद्धा मंजूर झाले आहे. लवकरच 700 एकर जमिनीवर पाचवी MIDC सुरू करण्याचा संकल्प असून, या दृष्टीने सरकारची प्रक्रिया सुरू आहे. विमानतळ सुरू करणे तसेच रेल्वेच्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे शुभ प्रयत्न सुरू आहेत. अकोला लोकसभा मतदारसंघातील भूमिपुत्र किरण सरनाईक यांना प्रचंड बहुमताने विजयी करा.
यावेळी आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे यांनीही आपल्या मतदारसंघातील आणि पाचही जिल्ह्यातील संपर्क असणाऱ्या शाळांचे शिक्षकांचे प्रचंड बहुमत किरण सरनाईक यांच्या पाठीशी उभे करू, असे अभिवचन दिले.
किरण सरनाईक म्हणाले -
ॲड.किरण सरनाईक मनोगत व्यक्त करताना
विधान परिषदेमध्ये केलेल्या कामकाजाचा सहा वर्षांचा लेखाजोखा मांडून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील तसेच सर्व बिनाअनुदानित, अनुदानित शाळांमध्ये डिजिटल शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून, शिक्षकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्नशील राहू. शिक्षकांच्या तालुका पातळीपासून ते प्रदेश पातळीपर्यंतच्या वैयक्तिक आणि संस्थेच्या समस्या सोडवण्यासाठी कोणताही भेदभाव करणार नाही. शिक्षकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. नवरात्रीच्या पर्वावर भारतीय जनता पक्षाने हा विजयाचा शंखनाद पहिल्याच फेरीत विजयी करणार, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच महायुतीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी मंचावर आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, आमदार हरीश पिंपळे, आमदार प्रकाश भारसाकळे, संतोष शिवरकर, विजय अग्रवाल, जयंत मसने, बळीराम सिरस्कार, पातूरचे माजी नगराध्यक्ष बुरहान भाई, केशवराव मालोकार, विजय थोटांगे, माधव मानकर, प्राध्यापक अनुप शर्मा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे, अंबादास उमाळे, रूपाली काकडे, राजेश नागमते, मनीष गावंडे, देवाशिष काकड, संजय गोटफोडे, विद्याधर काकड आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश जोशी यांनी केले, तर प्रास्ताविक स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी करून महायुतीतील प्रत्येक कार्यकर्ता किरण सरनाईक यांच्या विजयासाठी सदैव तत्पर राहील, असा विश्वास व्यक्त केला. आभार प्रदर्शन विजय थोटांगे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीताने झाली, तर सांगता राष्ट्रगीताने झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा