भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: न्यू इंडिया फ्लोटर मेडिक्लेम पॉलिसीचा क्लेम अवैधरित्या नाकारल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अकोला यांनी न्यू इंडिया अश्युरन्स कंपनीला दणका दिला आहे.
कंपनीने क्लेम नाकारला
तक्रारदार संजय अशोककुमार उधानी, (रा. मलकापूर, जि. बुलढाणा) यांनी पत्नी, स्वतः व मुलांसाठी पॉलिसी क्र. 16100034242800000185 घेतली होती. त्यांच्या पत्नीला Big Incisional Hernia चे निदान झाल्याने दि. ११/०३/२०२५ ते १५/०३/२०२५ दरम्यान शस्त्रक्रिया करावी लागली, ज्याचा खर्च ₹१,१०,९८६/- आला.
विमा कंपनीने "सन २०११ व २०२२ मधील सिझर डिलिव्हरीमुळे हर्निया झाला, हा प्रसूतीचा दुष्परिणाम आहे" असे कारण देत Exclusion Clause 4.4.15 अंतर्गत क्लेम नाकारला होता.
ॲड. एस. एस. कोटवाणी यांचा युक्तिवाद
तक्रारदारातर्फे ॲड. एस. एस. कोटवाणी यांनी युक्तिवाद केला की, ३ ते १४ वर्षांपूर्वी झालेल्या प्रसूतीचा संबंध आताच्या हर्नियाशी जोडणे हा Remote Causation आहे.
आयोगाचा आदेश
या युक्तिवाद ग्राह्य धरून अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी व सदस्य संजय माणिक यांच्या खंडपीठाने दिनांक ०६/१०/२०२६ रोजी निकाल दिला:
१. विमा कंपनीने क्लेमची रक्कम ₹१,१०,९८६/- दि. २१/०५/२०२५ पासून ७% वार्षिक व्याजासह द्यावी.
२. मानसिक व आर्थिक त्रासापोटी ₹१५,०००/- व तक्रार खर्च ₹५,०००/- द्यावा.
३. ४५ दिवसात आदेशाचे पालन न केल्यास ९% अतिरिक्त व्याज द्यावे लागेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा