illegal-moneylending-in-akola: अकोल्यात अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई; शहरातील ३५ ते ४० ठिकाणी छापेमारी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: शहरात अवैध सावकारी विरोधात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने मोठी कारवाई सुरू केली आहे. अवैध सावकारीसंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारे शहरातील तब्बल ३५ ते ४० ठिकाणी छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये काही व्यावसायिक प्रतिष्ठाने, कार्यालये आणि खासगी घरांचाही समावेश असल्याचे समजते.


या कारवाईसाठी उपनिबंधक कार्यालयाकडून दोन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी विविध ठिकाणी एकाच वेळी तपासणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या छापेमारीदरम्यान मोठ्या प्रमाणात कोरे धनादेश, बाँड आणि इतर आर्थिक व्यवहारांशी संबंधित दस्तऐवज आढळल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


या कागदपत्रांच्या तपासणीतून अवैध सावकारीचे व्यवहार उघड होणार का, तसेच या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येणार, याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, या कारवाईबाबत उपनिबंधक कार्यालयाकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच कारवाईचा नेमका तपशील स्पष्ट होणार आहे.

टिप्पण्या