shivsena-rajan-salvi-akola-city: आगामी निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी भगवा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे: डॉ. राजन साळवी
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आत्तापासूनच जोमाने कामाला लागावे, असे खणखणीत आवाहन शिवसेना अकोला जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार डॉ. राजन साळवी यांनी केले.
अकोला येथील हॉटेल ग्रीन अँड हॉटेल येथे पार पडलेल्या शिवसेना जिल्हा पदाधिकारी व 'एसआयआर' (SIR) संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीत ते बोलत होते.
व्यासपीठावर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीच्या व्यासपीठावर शिवसेना अकोला जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार डॉ. राजनजी साळवी यांच्यासह शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीरंगदादा पिंजरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रशेखर पांडे गुरुजी, शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विनभाऊ नवले, युवासेना महाराष्ट्र सचिव विठ्ठल सराफ पाटील, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई राऊत, विदर्भ प्रवक्ते प्रा. प्रकाश डवले, महानगरप्रमुख राजेश मिश्रा, जे. पी. सावंग, ॲड. पवनेश अग्रवाल, शारदाताई वाळके आणि मुकुंदराव मिळशीकर या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
संघटन बळकटीवर भर
बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांची रणनीती, 'एसआयआर' विषयक कामे आणि पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तळागाळातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून शिवसेनेचे विचार आणि कार्य घराघरांत नेण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले.
या बैठकीला शिवसेनेचे सर्व उपजिल्हाप्रमुख, महिला आघाडी, युवासेना तसेच अकोला जिल्ह्यातील विविध विभागांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीबाबतची सविस्तर माहिती शिवसेना अकोला जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल मालगे यांनी दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा