court-news-barshitakli-case-: पिडीतेने केलेल्या गंभीर आरोपांच्या प्रकरणात आरोपीला मोठा दिलासा; डिस्चार्ज अर्ज मंजूर, ॲड. प्रविण तायडे यांचे विधी क्षेत्रातून अभिनंदन

न्यायालयाच्या आदेशानंतर खटला पुढे न चालविता संपुष्टात


भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड 
अकोला : बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गंभीर आरोपांच्या प्रकरणात आरोपी मिलींद विनोद खंडारे (रा. भरतपूर) यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सत्र खटला क्र. ९९/२०२५ मध्ये आरोपीच्या वतीने दाखल करण्यात आलेला डिस्चार्ज अर्ज २रे जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. ए. संधू यांनी मंजूर केला. त्यामुळे सदर सत्र खटला पुढे न चालविता संपुष्टात आला.

२१ मे २०२५ रोजी दाखल झाली होती तक्रार

पीडितेने २१ मे २०२५ रोजी बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम ७५, ७८, ६३, ६४(२)(एम), ११५(१), ३३२(बी)(सी), ३३३ आणि ३५१(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तक्रारीमध्ये पिडीतेने आरोपीविरुद्ध शारीरिक व मानसिक प्रताडणा केल्याचे तसेच सोशल मीडियावर बदनामी करणे असे विविध गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. सदर आरोपांबाबत पोलीस तपासानंतर प्रकरण न्यायालयात आले होते.

आरोपीच्या वतीने डिस्चार्ज अर्ज दाखल

आरोपी मिलींद विनोद खंडारे यांच्या वतीने ॲड. प्रविण एम. तायडे यांनी न्यायालयात डिस्चार्ज अर्ज दाखल केला. या अर्जाच्या सुनावणीदरम्यान आरोपीच्या बाजूने प्रकरणातील कायदेशीर बाबी तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील संबंधित न्यायनिवाड्यांचा आधार घेत ॲड. तायडे यांनी युक्तिवाद केला.

आरोपीच्या बाजूने मांडण्यात आलेले कायदेशीर मुद्दे, उपलब्ध कागदपत्रे आणि प्रकरणातील परिस्थितीचा विचार करून २रे जिल्हा व सत्र न्यायाधीश टी. ए. संधू यांनी डिस्चार्ज अर्ज मंजूर केला.

खटला पुढे न चालविता संपुष्टात

न्यायालयाने डिस्चार्ज अर्ज मंजूर केल्यानंतर आरोपीविरुद्धचा सत्र खटला पुढे चालविण्याची प्रक्रिया थांबली आणि सत्र खटला क्र. ९९/२०२५ संपुष्टात आला.

या आदेशामुळे आरोपीला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

विधीज्ञांचे सहकार्य

या प्रकरणात ॲड. प्रविण एम. तायडे यांना ॲड. अजय जंजाळ, ॲड. प्रशिक मोरे, ॲड. अतुल खडसे, ॲड. प्रभाकर इंगळे, ॲड. आदेश वाघ, ॲड. साहील देशमुख, ॲड. मोनिका इंगळे आणि ॲड. कुणाल वासनिक आदी विधीज्ञांनी कायदेशीर बाबींमध्ये सहकार्य केले.

डिस्चार्ज अर्जावरील युक्तिवादानंतर न्यायालयाने आरोपीच्या बाजूने आदेश दिल्याने ॲड. प्रविण एम. तायडे यांचे विधी क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.


ठळक मुद्दे

- सत्र खटला क्र. ९९/२०२५ मध्ये आरोपीला दिलासा
- बार्शिटाकळी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते प्रकरण
- २१ मे २०२५ रोजी तक्रार दाखल
- BNS मधील विविध कलमांनुसार गुन्हा नोंद
- आरोपीच्या वतीने डिस्चार्ज अर्ज दाखल
- सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील निवाड्यांचा युक्तिवादात आधार
- २रे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. टी. ए. संधू यांच्याकडून अर्ज मंजूर
- आरोपीविरुद्धचा सत्र खटला पुढे न चालविता संपुष्टात


News Highlights 

अकोला न्यायालय, अकोला कोर्ट न्यूज, Akola Court News, बार्शिटाकळी पोलीस, Barshitakli News, सत्र खटला 99/2025, डिस्चार्ज अर्ज, मिलींद खंडारे, ॲड. प्रविण तायडे, Advocate Pravin Tayde, Akola Legal News, Akola District Court, Maharashtra Court News, BNS Case Akola

टिप्पण्या