- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
gold-coin-fraud-crime-news-: बनावट सोन्याच्या नाण्यांचा मोठा घोटाळा! कोल्हापूरच्या हॉटेल व्यावसायिकाची अकोल्यात 15 लाखांची फसवणूक
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
घर पाडताना सापडलेल्या 'सोन्याच भरण 'चे आमिष; तपासणीसाठी दिलेले नाणे खरे, मात्र 3.3 किलो नाणी निघाली बनावट
भारतीय अलंकार न्यूज 24
अकोला | नीलिमा शिंगणे जगड
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील नांदखेड फाटा येथे बनावट सोन्याच्या नाण्यांच्या आमिषाने कोल्हापूरच्या एका हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने आधी विश्वास संपादन करून खरे सोन्याचे एक नाणे दाखवले, त्यानंतर लाखोंची रक्कम उकळून बनावट नाणी देत फरार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमके काय घडले?
कोल्हापूर येथील हॉटेल व्यावसायिक युवराज चांदोबा कांबळे यांना आरोपी गणेश इंगळे याने फोन करून, "घर पाडताना माझ्या नातेवाईकाला सोन्याच भरण (हंडी) सापडली असून त्यात साडेतीन किलो सोन्याची नाणी आहेत," असे सांगितले. तसेच, "मी तुमच्या हॉटेलमध्ये पूर्वी जेवायला आलो होतो," असे सांगून आरोपीने त्यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर आरोपीने व्हॉट्सअपवर कथित सोन्याच्या नाण्यांचे फोटो पाठवले आणि बाजारभावापेक्षा कमी दरात 50 लाख रुपयांत संपूर्ण नाणी विकण्याची तयारी दर्शवली.
खऱ्या नाण्यामुळे बसला विश्वास
व्यवहारापूर्वी आरोपीने तपासणीसाठी एक नाणे दिले. हे नाणे सोनाराकडे तपासले असता ते खरे असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे युवराज कांबळे यांचा आरोपीवर पूर्ण विश्वास बसला.
15 लाखांची रोख रक्कम देऊन घेतली बनावट नाणी
विश्वास बसल्यानंतर युवराज कांबळे हे कोल्हापूरहून पातूर येथे आले. 4 जुलै रोजी नांदखेड फाटा परिसरात दोघांमध्ये व्यवहार झाला. कांबळे यांनी 15 लाख रुपये रोख आरोपीकडे सुपूर्द केले.
ही रक्कम उभी करण्यासाठी त्यांनी घरातील सोने तारण ठेवून बँकेतून गोल्ड टर्म लोन घेतल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
रक्कम स्वीकारल्यानंतर आरोपीने सुमारे 3 किलो 300 ग्रॅम वजनाची कथित सोन्याची नाणी दिली. मात्र पुढील तपासणीत ही सर्व नाणी बनावट असल्याचे स्पष्ट झाले.
आरोपीचा मोबाईल बंद; फसवणूक उघड
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कांबळे यांनी आरोपीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचे सर्व मोबाईल क्रमांक बंद असल्याचे समोर आले. त्यामुळे आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पोलीस अधीक्षकांकडे धाव
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, पातूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता ती स्वीकारण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी थेट अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकार मांडला.
तक्रार ऐकल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पातूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना तातडीने गुन्हा दाखल करून तीन दिवसांत आरोपींना अटक करण्यासाठी आवश्यक कारवाई, तसेच फसवणुकीतील मुद्देमाल जप्त करून फिर्यादीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिल्याची माहिती तक्रारदाराने दिली. त्यानुसार पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
तक्रारदाराची मागणी
युवराज कांबळे यांनी आरोपींवर कठोर कारवाई करून आपले 15 लाख रुपये परत मिळावेत, तसेच भविष्यात अशा प्रकारे इतर कोणाचीही फसवणूक होऊ नये, अशी मागणी केली आहे.
ठळक मुद्दे
- बनावट सोन्याच्या नाण्यांच्या आमिषाने 15 लाखांची फसवणूक.
- तपासणीसाठी दिलेले एक नाणे खरे; उर्वरित 3.3 किलो नाणी बनावट.
- घरातील सोने तारण ठेवून बँकेतून कर्ज घेऊन व्यवहार.
- आरोपी व्यवहारानंतर मोबाईल बंद करून फरार.
- पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू.
- आरोपींवर कठोर कारवाई व रक्कम परत मिळवून देण्याची तक्रारदाराची मागणी.
Akola
Akola News
Breaking News
Crime News
Digital News Marathi News
Fake Gold
Fraud Case
Gold Coin Fraud
Kolhapur
Maharashtra News
Nandkhed Phata
Patur
Police
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा