- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
breaking-news-fake-currency अकोल्यात बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, तीन आरोपी अटकेत, ₹97 हजारांच्या नकली नोटा जप्त
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीची मोठी कारवाई; ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात चलनात आणण्याचा कट उधळला
ठळक मुद्दे
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
तीन आरोपींना अटक
₹97 हजार किमतीच्या बनावट (नकली) चलनी नोटा जप्त
५०० रुपयांच्या एकूण १९४ बनावट नोटा हस्तगत
आणखी आरोपींचा सहभाग आहे का? पोलिसांचा सखोल तपास सुरू
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) अकोला यांनी भारतीय चलनातील बनावट (नकली) नोटांचे रॅकेट उध्वस्त करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत ५०० रुपयांच्या एकूण १९४ बनावट नोटा, म्हणजेच सुमारे ₹97 हजारांचा बनावट चलनसाठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
गोपनीय माहितीवरून रचला सापळा
१७ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, गुडधी येथील चंदन भिमराव धांडोरे हा बनावट नोटा खऱ्या असल्याचा भास निर्माण करून बाजारात चलनात आणण्यासाठी घेऊन जाणार आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना देण्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने विशेष पथक तयार करण्यात आले.
पहिल्या आरोपीकडून २१ बनावट नोटा जप्त
एलसीबीच्या पथकाने गुडधी परिसरातील आलियाबाद रोडवर सापळा रचून चंदन भिमराव धांडोरे (वय ४३) याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ५०० रुपयांच्या २१ बनावट नोटा आढळून आल्या. पंचांसमक्ष तपासणी केली असता त्या भारतीय चलनाच्या नकली नोटा असल्याचे स्पष्ट झाले.
चौकशीत उघड झाले संपूर्ण रॅकेट
चंदन घांडोरे याच्या चौकशीत या नोटा मुर्तिजापूर येथील जहीरोद्दीन जबिरोद्दीन याच्याकडून मिळाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी मुर्तिजापूर येथील आसरा फाटा परिसरातून जहीरोद्दीनला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून ५०० रुपयांच्या १७३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. पुढील चौकशीत या नोटा गुडधी येथील विठ्ठल संजय वारोकार याच्याकडून मिळाल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर विठ्ठल वारोकार यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याने या बनावट नोटा बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील एका व्यक्तीकडून आणल्याची कबुली दिली.
बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न
तपासात आरोपी बनावट नोटा खऱ्या नोटांप्रमाणे वापरून बाजारात चलनात आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
तीन आरोपींवर गुन्हा दाखल
या प्रकरणात खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे:
चंदन भिमराव धांडोरे (वय ४३), रा. गुडधी, ता. जि. अकोला
जहीरोद्दीन जबिरोद्दीन, रा. पठाणपुरा, मुर्तिजापूर, जि. अकोला
विठ्ठल संजय वारोकार (वय ३५), रा. गुडधी, ता. जि. अकोला
तिघांविरुद्ध पोलीस स्टेशन सिव्हील लाईन, अकोला येथे भारतीय न्याय संहितेच्या कलम १८० व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर तसेच त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
पथकामध्ये सहायक पोलीस निरिक्षक निलेश देशमुख, गोपाल जाधव, पोलीस उपनिरिक्षक माजीद पठाण, अनिल चव्हाण पोलीस अमंलदार शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनोने, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, मंगेश इंगळे, श्रीकांत पातोंड, अमोल दिपके, आकाश मानकर, अभिषेक पाठक, राज चंदेल, धिरज वानखेडे, कमलेश धर्माधिकारी, देवानंद खरात, प्रकाश लोखंडे यांचा समावेश होता.
Akola
Akola News
Akola Police
Breaking News
Counterfeit Notes
Crime News
Fake Currency
Indian Currency
LCB Akola
Local Crime Branch
Maharashtra News
Marathi News
Police Action
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा