akola-medical-college-hospital: आमदार सावरकर यांची अकोला मेडिकल कॉलेजला अचानक भेट ; सुविधांबाबत अधिकाऱ्यांना दिले तातडीचे निर्देश

आमदार रणधीर सावरकर यांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला 



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अकोला मेडिकल कॉलेज व जिल्हा रुग्णालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अकोला मेडिकल कॉलेज अभ्यासगत समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी आज अचानक भेट देऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली.


आमदार सावरकर यांनी तब्बल 3 तास रुग्णालय परिसर पिंजून काढला. प्रत्येक वार्डमध्ये जाऊन रुग्णांची विचारपूस केली. रुग्णांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. स्वच्छता, औषधे, उपचार आणि इतर सुविधांबाबत माहिती घेतली.


यावेळी त्यांनी डॉक्टरांशी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून कामकाजाचा आढावा घेतला. रुग्णांना कोणतीही अडचण येऊ नये आणि सर्वांना तातडीने चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. राज्य शासनाकडे प्रलंबित असले प्रश्न त्वरित सोडवण्याचे अभिवचनही त्यांनी दिले.


यावेळी महापौर शारदा खेडकर, प्राचार्य किशोर मालोकार यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.


आमदार सावरकर म्हणाले, "रुग्णसेवा हीच खरी सेवा आहे. मेडिकल कॉलेजमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला सन्मानाने आणि तातडीने उपचार मिळाले पाहिजेत."


टिप्पण्या