yakub-khan-murder-case-akola: आपसी वैमनस्यातून घडला थरार! हवालदार ढगेकर यांच्या तत्पुरतेमुळे याकूब खानचा मारेकरी त्वरित जेरबंद; फरार आरोपीचा शोध जारी



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला हददीत जुने शहर येथील नगरसेवक रफियाबी याकुब खान याचे पती याकुब खान युनुस खान याचेवर चाकुने जीवघेणा हल्ला करणा-या मारेक-यास पोलीस हवालदार प्रवीण ढगेकर यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे   त्वरीत जेरबंद करण्यात आले. अटक झालेल्या आरोपीचे नाव वसीम अहेमद उर्फ चांवडया गुलाम अयुब असून, दुसऱ्या आरोपीचा शोध जारी आहे. दरम्यान उपचार सुरू असताना याकूब खान यांचे निधन झाले.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज मंगळवार ३० जून २०२६ रोजी रफियाबी याकुब खान याचे पती याकुब खान युनुस खान हे रेल्वे स्टेशन कडुन अग्रसेन चौक कडे इलेक्ट्रिक ओला कंपनीच्या दुचाकीवर जात असताना, जिजाउ हॉलच्या समोरील रोडवर अग्रसेन चौकाकडुन विरुध्द दिशेने वसीम अहेमद उर्फ चांवडया गुलाम अयुब त्याचे मोटर सायकलवर बसलेला एक लाल टि शर्ट घातलेला त्याचे सहकारी इसमासह येवुन त्याने त्याचे दुचाकीने याकुब खान त्याच्या दूचाकीला धडक दिली. थडक दिल्यावर वसीमच्या मागे बसलेला त्याचा सहकारी तेथुन मागेच पळून गेला. धडक दिल्यामुळे याकुब खान युनुस खान त्याची दुचाकी पडली तेव्हा वसीम अहेमद याने त्यांच्यावर जिवे मारण्याचे उददेशाने त्याने त्याचे जवळ बाळगलेल्या चाकुने छातीवर, पोटावर, डावे माडीवर चाकुवा सपासप वार करून घटनास्थळावरून पळून जात असताना, पोलीस स्टेशन रामदासपेठ, अकोलाचे पोहवा प्रविण ढगेकर यांनी तत्परता दाखवित पळुण जाणा-या मारेक-यास जिवाची पर्वा न करता शिताफिने त्वरीत पकडुन पो स्टे रामदासपेठ ला आणले व नमुद जखमी यास इतर पो स्टे स्टॉफचे मदतीने वैदयकीय उपचारा करीता शासकीय वैदयकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय, अकोला येथे भरती केले त्यानंतर आयकॉन हॉस्पीटल येथे भरती केले. सदर जखमी व आरोपी हे एकमेकाचे ओळखीचे तसेच नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये आपसी जुने वाद होते. 


या प्रकरणाच्या अनुषंगाने पो स्टे रामदासपेठ, अकोला येथे फिर्यादी नामे ईस्माईल खान याकुब खान यानी दिलेल्या जबानी रिर्पोट वरून पो स्टे ला अप क ४३१/२०२६ कलम १०९ (१), ३ (५) भारतीय न्याय संहिता २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला परंतु नमुद जखमी याकुब खान युनुस खान याचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने नमुद गुन्हयात कलम १०३ (१) भारतीय व्याय संहिता २०२३ प्रमाणे वाढ करण्यात आली असुन मा. विदयामान न्यायालयास कळविण्यात आले आहे. तसेच आरोपी वसीम अहेमद यांचे सोबत असलेला दुस-या आरोपीच्या शोधासाठी पोलीस स्टेशनची तसेच स्थानिक गुन्हे शाखाचे पथक रवाना करण्यात आलेले आहे.


उपरोक्तं कार्यवाही  पोलीस अधिक्षक  अर्चित चांडक तसेच अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत रेडडी. व  उप विभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनात व  पोलीस निरिक्षक रामदासपेठ, अकोला  शिरीष खंडारे  यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरिक्षक संदिप बालोदे, सहायक पोलीस उपनिरिक्षक  किरण गवई, पोलीस हवालदार प्रविण ढगेकर, हेड कॉन्स्टेबल सुरेश लांडे, संदिप वानखडे, कॉन्स्टेबल रोशन पटले, अनिल धनभर, अभिजीत इंगळे, इमाम चौधरी, पुरूषोत्तम डंबेलकर, चालक सुरेद्र खंडारे, प्रविण पेठे आदींनी केली.

टिप्पण्या