- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
rescue-operation-barshi-takali: 65 फूट खोल खदानीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह 20 मिनिटांत शोधला; संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाची धाडसी कामगिरी
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या बचाव पथकाची धाडसी कामगिरी; बार्शीटाकळी पोलिसांच्या मदतीने यशस्वी शोधमोहीम
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला, दि. 1 जून : कुंभारी-विझोरा मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खदानीत बुडालेल्या 17 वर्षीय युवकाचा मृतदेह पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने अवघ्या 20 मिनिटांत शोधून बाहेर काढला. या धाडसी आणि तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी कार्य म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे.
खदानीत बुडालेल्या युवकाचा शोध रविवारी (31 मे) दुपारपासून सुरू होता. मात्र युवक नेमका कोणत्या ठिकाणी बुडाला याची अचूक माहिती उपलब्ध नसल्याने शोधमोहीमेत अडचणी येत होत्या.
सोमवारी (1 जून) सकाळी 6 वाजता बार्शीटाकळी पोलीस स्टेशनमार्फत पिंजर येथील संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख तथा जीवनरक्षक दीपक सदाफळे यांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच दीपक सदाफळे यांच्यासह शेखर केवट, ऋषिकेश राखोंडे आणि विष्णू केवट हे सहकारी शोध व बचाव साहित्य घेऊन सकाळी 7 वाजता घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी पाहणी केल्यानंतर खदानीत सुमारे 60 ते 65 फूट खोल पाणी असून तळाशी मोठ्या प्रमाणात दगड व चिफा असल्याचे निदर्शनास आले. बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रवीण धुमाळ यांच्या आदेशानुसार आणि पीएसआय निलेश चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय अनिल येण्णेवार व पोलीस कॉन्स्टेबल योगेश पडवळ यांच्या उपस्थितीत शोधमोहीम सुरू करण्यात आली.
अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत बचाव पथकाने शोधकार्य सुरू केले आणि अवघ्या 20 मिनिटांत खदानीच्या तळाशी अडकलेला मृतदेह शोधून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
मृत युवकाची ओळख अनुकल्प सुनील वाघमारे (वय 17, रा. कृषीनगर, अकोला) अशी पटली. मृतकाचे मावसे मंगेश गवई (रा. विझोरा) यांनी मृतदेहाची ओळख निश्चित केली.
घटनास्थळी मृतकाचे नातेवाईक, विझोरा येथील नागरिक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे तसेच पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे हेही संपूर्ण कारवाईदरम्यान संपर्कात होते.
ठळक मुद्दे
*65 फूट खोल खदानीत बुडालेल्या युवकाचा मृत्यू
*संत गाडगेबाबा शोध व बचाव पथकाची धाडसी कामगिरी
*अवघ्या 20 मिनिटांत मृतदेह शोधून बाहेर काढला
*बार्शीटाकळी पोलिसांच्या समन्वयातून यशस्वी शोधमोहीम
*मृत युवकाची ओळख अनुकल्प सुनील वाघमारे (17) अशी पटली
मानवतेची सेवा करणारे धाडसी जवान
मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने अनेक आपत्कालीन परिस्थितींमध्ये जीव धोक्यात घालून केलेली मदत आणि बचावकार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यांच्या तत्परतेमुळे मृत युवकाचा शोध लागून नातेवाईकांना दिलासा मिळाला.
Akola News
Barshitakli
Breaking News
Disaster Management
Maharashtra News
Pinjar
Rescue Operation
Rescue Team
Sant Gadge Baba
Youth Drowning Case
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा