crime-news-aalegoan-murder: पातूर तालुक्यातील आलेगाव येथे एका नवतरुणाची निर्घृण हत्या




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला शहरातील तार फाईल भागात एका युवकाची शनिवारी रात्री धारधार शस्त्राने हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच आज रविवारी पहाटे पातूर तालुक्यातील आलेगाव येथे शेकापुर फाट्याजवळ एका सतरा वर्षीय नवतरुणाची निर्घृण हत्या झाल्याचे उघडकीस आले. 



या दोन्ही घटनेमुळे अकोला जिल्हा हादरून गेला. क्षुल्लक कारणांनी घडलेल्या या घटनेमुळे अकोल्याची रविवारची पहाट  रक्तरंजित ठरली.


आलेगाव येथील घटनेतील मृतकाचे नाव यश गजानन गिऱ्हे असल्याचे समोर आले आहे. दोन दिवसा पूर्वी एका पेट्रोल पंप वर काही युवकांशी मृतक यशचा वाद झाल्याचे आता समोर येत आहे. शेकापूर फाट्या जवळ आज सकाळी काही युवकांनी यश याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करून फरार झाले.  यानंतर नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी युवकास रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.



या घटनेत तीन संशयित आरोपींचे नावे समोर आली असून, त्यापैकी एकाला पोलीसांनी चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. तर उर्वरित दोघांचा शोध सुरू असल्याचे कळते. पोलीस तपासानंतर घटने मागील सत्य समोर येईल. घटनेचा अधिक तपास पातूर पोलीस करीत आहेत.


सदर बातमीचा व्हिडिओ:

video news: आलेगाव येथे तरुणाची हत्या





टिप्पण्या