court-update-bail-granted-akl: अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला जमानत; ॲड. इल्यास शेखानी यांचा प्रभावी युक्तिवाद




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लग्नाची मागणी घालून तिचे शोषण करण्याचा आरोप असलेल्या आरोपीचा अकोला न्यायालयाने अटी व शर्ती सह जमानत अर्ज मंजूर केला. न्यायालयात अर्जदाराची (आरोपी) बाजू ॲड. इल्यास शेखानी यांनी प्रभावीपणे मांडली.



सदर प्रकरणाची हकीकत अशी की, दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी पोलीस स्टेशन बाळापुर येथे फिर्यादी  यांनी रिपोर्ट दिला की, दि.२३ जानेवारी २०२६ रोजी फिर्यादी व त्यांचे पती कामावर गेले होते. कामावरून दुपारी घरी आले असता त्यांची १६ वर्षीय मुलगी घरी मिळुन आली नाही.  मुलीचा संध्याकाळ पर्यंत शोध घेतला मात्र सापडली नाही. यानंतर फिर्यादीने पोलिसात तक्रार दाखल करून,  मोहल्ल्यात राहणारा अजीम खान अफजल खान ( वय २० वर्ष) याने  मुलीला पळवुन नेले आहे, असा संशय व्यक्त करून, पोलीस स्टेशन बाळापुर येथे अजीम खान याचे विरूध्द तक्रार दिली. पोलिसांनी फिर्यादीचे जबाणी रिपोर्ट वरून आरोपीवर 137(2) of the Bharatiya Nyaya Sanhita, 2023 नुसार गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले.




यानंतर दि. २४ मे २०२६ रोजी अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, अकोला यांचे पथकाने सदर गुन्हातील आरोपी व पिडीता यांना मुंबई मधील मानखुर्द येथील महाराष्ट्र नगर, सिंधुदुर्ग चाळ येथुन आपली ओळख सांगुन गुन्हा दाखल बाबत माहीती देवून ताब्यात घेतले. दि.२५ मे २०२६ रोजी पोलीस स्टेशन बाळापूर येथे पिडीता व आरोपी अजीम खान अफजल खान वय २० वर्ष यांना हजर केले. तसेच त्यांना ताब्यात घेवून  पिडीता हीचे बयान नोंदविले.  



दरम्यान, आरोपीने वकील ॲड इल्यास शेखानी यांच्या मार्फत न्यायालयात जमानत अर्ज दाखल केला. या प्रकरणी अर्जदार आरोपीचे वकील ॲड इल्यास शेखानी यांनी न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला की, अर्जदार आरोपी २५ मे २०२६ पासून कारागृहात आहे. गुन्ह्याचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. सुरुवातीला बीएनएस (BNS) च्या कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर कलम ८७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तथापि, शारीरिक संबंधांसाठी पीडितेस कोणतेही आमिष दाखवण्यात आले नव्हते किंवा धमकावण्यातही आले नव्हते. कोणताही आरोपी आणि पीडिता यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झालेला नाही. त्यामुळे, सदर कलमे लागू होत नाहीत. अर्जदार आरोपीविरुद्ध कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही. परिणामी, त्याला आणखी कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही. म्हणून, हा अर्ज मंजूर करण्यात यावा.  सरकारी वकील (APP) आणि तपास अधिकारी (I.O.) यांनी त्यांच्या लेखी म्हणणे मांडले.


दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपीचा जमानत अर्ज न्यायालयाने मंजूर केला.


अर्जदार आरोपी अझीम खान अफझल खान, ( रा. कासारखेड, बाळापूर, ता. बाळापूर, जि. अकोला) यास वैयक्तिक बंधपत्र आणि अटी व शर्ती सह आरोपीस मुक्त करण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने दिला. याबाबत कारागृह प्रशासनाला सूचित करण्याचे आदेशात नमूद केले आहे. हा आदेश न्या. पी. बी. नाईकवाड (अतिरिक्त सत्र न्यायाधीश, अकोला) यांचे कोर्टाने ११ जून २०२६ रोजी दिला.







टिप्पण्या