census-work-maharashtra-akl: जनगणनेच्या कामात अकोला महानगरपालिका राज्यात दुस-या क्रमांकावर



भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला:  जनगणना संचालनालय भारत सरकार यांच्या निर्धारित कार्यक्रमानुसार जनगणना संचालनालय महाराष्ट्र, जनगणनाच्या पहिल्या टप्पा अंतर्गत 1 मे 2026 या रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ.सुनिल लहाने यांच्या मार्गदर्शनात जनगणाना कार्यास प्रारंभ करण्यात आला, या अनुषंगाने 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्वगणना कार्यास मनपा प्रशासनाचे चार्ज अधिकारी यांचे नियंत्रणांतर्गत जनगणना कामाकरीता नियुक्त पर्यवेक्षक आणि प्रगणक यांचे मार्फत करण्यात आले, तर दि. 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणक यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात असलेल्या भागात घरभेटी देऊन जनगणना संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचे प्राप्त निर्देशाव्दारा माहिती संकलीत करून घरगणना करण्यात आली. अकोला महानगरपालिकाव्दारा पहिल्या टप्प्याचे काम निर्धारित कालावधीच्या अंतीम तारखेपुर्वी पुर्ण केले असून महाराष्ट्रातील महागनरपालिकांमधून अकोला महानगरपालिका दुस-या क्रमांकाने काम पुर्ण करणारी महानगरपालिका म्हणून जनगणना संचालनालयाकडे नोंद झाली आहे. 

सदर जनणनाच्या कामामध्ये मनपा आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ.सुनिल लहाने व विभागीय समन्वयक प्रवीण भगत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि जिल्हा समन्वयक कार्तिक गडलिंग यांचेसह सर्व क्षेत्रीय प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 

या बद्दल आज दि. 10 मे रोजी मनपा अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांनी त्यांच्या दालनात शहर जनगणना अधिकारी व सर्व चार्ज अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले. यावेळी अद्यापही तीन दिवसाचा कालावधी शिल्लक असल्याने चार्ज अधिकारी यांनी प्रगणकाव्दारा सादर कामाचे स्वनिरीक्षण करून तांत्रिक चुका झाल्या असल्यास त्या तातडीने दुरूस्त करून 100 टक्के बिनचूक अहवाल जनगणना संचालनालया कडे सादर कारावा अशा सुचना देऊन चार्ज अधिकारी यांनी शहर जनगणना कामाकरिता अहोरात्र परिश्रम केल्याने तसेच त्यांचे अधिनस्त कार्यरत पर्यवेक्षक व प्रगणक यांनी सुध्दा उन्हाची तमा न बाळगता घरोघरी भेटी देऊन यशस्वीरित्या काम केल्याने या सर्वांचे अभिनंदन केले. 

यावेळी मनपा उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी दिलीप जाधव, जनगणना विभाग प्रमुख अनिल बिडवे, सहा.आयुक्त तथा चार्ज अधिकारी विठ्ठल देवकते, देविदास निकाळजे, राजेश सरप, गजानन घोंगे, अतिरिक्त चार्ज अधिकारी - सिस्टीम मॅनेजर हीरा मानकर, जी. आ. एस. विभाग प्रमुख चंदन प्रसाद, संगणक विभाग प्रमुख हेमंत रोजतकर, श्रेयश नागलकर आदींची उपस्थिती होती.     


टिप्पण्या