independence-day-2026-akl: स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात अकोला शहर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले!
independence-day-2026-akl: स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात अकोला शहर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळाभारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला | 29 जून 2026
पावसाळा सुरू होताच संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी अकोला महानगरपालिका प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. महापौर शारदा खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 29 जून) विशेष आपत्ती व्यवस्थापन बैठक आयोजित करण्यात आली. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या बैठकीत शहरातील पावसाळी समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
बैठकीत स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी शहरातील संभाव्य आपत्तीस्थिती हाताळण्यासाठी झोननिहाय स्वतंत्र चार आपत्ती व्यवस्थापन पथके स्थापन करण्याची सूचना केली. ही पथके पावसाळ्यात 24 तास सातही दिवस कार्यरत राहणार असून आवश्यक यंत्रसामग्री आणि साहित्याची तात्काळ खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले.
पावसाळ्यात शहरात अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे पडणे, पथदीप बंद पडणे तसेच पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कारवाई करण्यासाठी प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.
🔹 झोननिहाय स्वतंत्र चार आपत्ती व्यवस्थापन पथके कार्यान्वित होणार
🔹 सर्व पथके 24x7 सेवा देणार
🔹 पाणी साचलेल्या भागांसाठी जनरेटरवर चालणारे पंप खरेदी करण्यात येणार
🔹 पडलेली झाडे हटविण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये कटर मशीनची व्यवस्था
🔹 शहरातील विहिरींवर संरक्षणासाठी जाळी बसविणार
🔹 पाणी साचणाऱ्या रस्त्यांचे सर्वेक्षण करून स्क्रॅपिंगची यादी तयार होणार
🔹 नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देण्यावर भर
बैठकीत विजय अग्रवाल यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाला इशारा दिला की, आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात निष्काळजीपणा किंवा कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींची वाट न पाहता नियमित पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. तसेच बंद पथदीप, अरुंद नाले, धापे आणि स्वच्छतेच्या समस्यांवर तातडीने काम करण्याचे आदेश देण्यात आले. नाल्यांची स्वच्छता युद्धपातळीवर करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.
या बैठकीला उपमहापौर अमोल गोगे, सभागृह नेते पवन महल्ले, नगरसेवकांसह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा