- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
swimming-summer-camp-akl: जय श्रीराम ग्रुपच्या वतीने स्विमिंग प्रशिक्षणार्थींना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेत असताना अनेक विद्यार्थी नवीन कौशल्ये आत्मसात करण्याकडे वळत आहेत. अकोल्यातील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पोहण्याकडे विद्यार्थ्यांचा कल वाढताना दिसत आहे. वसंत देसाई स्टेडियम येथील मास्टर पावर स्विमिंग संचालित तरण तलाव येथे सुरू असलेल्या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरात सध्या मोठ्या संख्येने विद्यार्थी पोहण्याचे धडे घेत आहेत.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांसोबत अनेक पालकही पोहणे शिकण्यासाठी पुढाकार घेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जय श्रीराम ग्रुपच्या वतीने पोहणे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. याच अनुषंगाने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना पोहण्याचे आरोग्यदायी आणि जीवनरक्षक महत्त्व समजावून सांगण्यात आले. तसेच पोहता न आल्यामुळे घडलेल्या काही दुर्दैवी घटनांची उदाहरणे देत जलसुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर घालण्यासाठी कार्यक्रमात लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पोहण्याविषयी अधिक आत्मविश्वास आणि आवड निर्माण झाली.
जय श्रीराम ग्रुपचे सदस्य पोहणे शिकण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी व नागरिकाला सातत्याने प्रोत्साहन देत असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येकाने पोहणे शिकावे असा संदेश यावेळी देण्यात आला.
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत विद्यार्थी केवळ नवीन कौशल्य आत्मसात करत नाहीत, तर जीवनासाठी आवश्यक असलेले पोहण्याचे महत्त्वही जाणून घेत आहेत. अशा सकारात्मक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळत आहे अशी भावना उपस्थितानी व्यक्त केली.
मास्टर पॉवर स्विमिंग क्लबच्या सर्व प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांना पोहण्यासाठी योगेश पाटील , डॉ.राजेश काटे , नंदू भाऊ बुलबुले , पवन केडिया, संतोष तोष्णीवाल , गणेश भिरड, ऍड. राधेश्याम मोदी , मिश्रा, रेखचंद भंसाली, विजय अग्रवाल यांचं मार्गदर्शन असते.
आजच्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अशोक गुप्ता, नरेंद्र राठी, शिवप्रकाश मंत्री , सुभाष बिलाला, डॉ. महेंद्र काळे, डॉ.मधुसूदन बगडिया, डॉ. गिरधर पनपालिया, अरुण कुमार सिन्हा, प्रकाश सराफ , ऍड. राजन देशपांडे , दिनेश गोडा, दिपक मायी, नरेंद्र तापडिया, लक्ष्मीकांत शुक्ला, उपस्थित होते. ऍड. मनमोहन सारडा, गोपाल चौधरी, आरिफ भाई, इद्रिस भाई ,अभय पांडे, दीपक खंडेलवाल , सुनील बगड़िया , राजेश्वर कवाडे ,डॉ. शाह , मनोज बोधानी , रणछोडदास राठी, हेमेंद्र राजगुरू यांनी अथक परिश्रम घेत हा कार्यक्रम यशस्वी केला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा