independence-day-2026-akl: स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात अकोला शहर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले!
independence-day-2026-akl: स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहात अकोला शहर तिरंग्याच्या रंगात न्हाऊन निघाले!
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
f
मुख्य सामग्रीवर वगळाभारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला : राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार बरखास्त करण्यात आलेली शिवसेनेची अकोला जिल्हा कार्यकारणी लवकरच नव्याने गठीत करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे अकोला लोकसभा संपर्कप्रमुख व माजी आमदार राजन साळवी यांनी दिली.
शनिवारी अकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवा नेते व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विदर्भ दौऱ्याबाबत माहिती देण्यात आली.
शिवसेनेची अकोला जिल्हा कार्यकारणी नव्याने गठीत होणार
पक्ष वाढविणाऱ्या कार्यकर्त्यांना नव्या कार्यकारणीत संधी
१६ ते २१ मे दरम्यान खा. श्रीकांत शिंदे यांचा विदर्भ दौरा
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवर शिवसेनेचे लक्ष
बेरोजगारी, महिला सशक्तिकरण आणि स्वावलंबनावर भर
राजन साळवी यांनी सांगितले की, शिवसेनेच्या कार्यपद्धतीनुसार नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठी जुनी कार्यकारणी बरखास्त करण्यात आली आहे. जिल्ह्याची व्याप्ती लक्षात घेता संघटनात्मक काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी राज्यात चार जिल्हाप्रमुख नेमण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
ते पुढे म्हणाले की, पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या आणि संघटन वाढविणाऱ्या कार्यकर्त्यांना नव्या कार्यकारणीत प्राधान्य दिले जाईल.
युवा नेते खा. श्रीकांत शिंदे यांच्या विदर्भ दौऱ्यात संघटन बांधणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी सक्षम आणि कर्तबगार उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू असल्याचेही साळवी यांनी स्पष्ट केले.
“जिल्हा परिषदवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार करण्यात आला असून त्या दृष्टीने संघटन अधिक मजबूत केले जाणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना बेरोजगारी, महिला सशक्तिकरण आणि स्वावलंबन या मुद्द्यांवर विशेष भर देत असल्याचे साळवी यांनी नमूद केले. पक्ष निधीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी “पक्ष निधी हा गौण विषय असून निधीचा उपयोग शहराच्या विकासासाठी व्हावा, हीच शिवसेनेची भूमिका आहे,” असे स्पष्ट केले.
यावेळी माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेखा राऊत, उषा विरक, महानगर प्रमुख राजेश मिश्रा, संतोष अनासने, डॉ. अशोक ओळंबे, प्रशांत भटकर, रामकृष्ण डोंगरे, प्रणव तायडे, किशोर निमकंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा