भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथील रहिवाशी डॉ. अभिषेक दिगंबर राऊत हे बेपत्ता झाले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राऊत हे १ मे रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास आपल्या अकोला शहरातील सातव चौकातील राहत्या खोलीवरून टू-व्हीलरने कुणालाही काहीही न सांगता निघून गेले आहेत.ते ज्या टू-व्हीलरने गेले आहेत, ती 'शाइन' (Shine) कंपनीची असून तिचा क्रमांक MH30 BQ9308 असा आहे. बराच वेळ होऊनही ते घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला, मात्र अद्याप त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. डॉक्टर राऊत बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी रामदास पेठ पोलिसात दिली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
संपर्क करण्याचे आवाहन..
जर कुणाला डॉ. अभिषेक राऊत किंवा त्यांच्या टू-व्हीलरबद्दल काहीही माहिती मिळाल्यास, कृपया खालील मोबाईल क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन कुटुंबीयांनी केले आहे.
१)९४२१८३६७२७
२)९८२२२३७१८८
३)९४२०८३८६८३
नातेवाईकांनी नागरिकांना मदतीचे आणि माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा