court-update-crime-news-akl: घरगुती वादातून महिलेस मारहाण प्रकरण: आरोपीची निर्दोष मुक्तता; ॲड. शितल ब्राह्मणे यांचा जोरकस युक्तिवाद




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: घरगुती वादातून नात्याने काकू असलेल्या महिलेस मारहाण केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातून आरोपी पुतण्या रवी वामनराव खंडारे याची अकोला न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. न्यायालयात आरोपीची बाजू फौजदारी विधिज्ञ शितल प्रकाश ब्राह्मणे यांनी भक्कमपणे मांडली. 


प्रकरणाची हकीकत अशी की, पोलीस स्टेशन बोरगाव मंजू येथे आरोपी रवी वामनराव खंडारे व बबन पिराजी खंडारे (राहणार नवी वस्ती काटेपूर्णा तालुका जिल्हा अकोला) यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक 64/ 2020 नुसार दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी गुन्हा नोंद झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी विरुद्ध तक्रारदार नंदा बबन खंडारे (राहणार नवी वस्ती काटेपूर्णा) यांनी त्यांच्या घरी हजर असता, तिचे पती आरोपी बबन खंडारे याला म्हटले की, “किराणा सामान संपले घेऊन या”, अश्या शुल्लक कारणावरून आरोपीने फिर्यादी हिला शिवीगाळ केली व दोन-तीन थापडा मारून घराबाहेर निघून गेला. त्यानंतर तक्रारदार घराजवळील हापसीवर कपडे धुण्यास गेली; तेव्हा त्यांचा पुतण्या आरोपी क्रमांक १ रवी वामन खंडारे व तक्रारदाराचे पती आरोपी क्रमांक दोन बबन खंडारे तेथे आले. त्यावेळेस आरोपी क्रमांक १ याने फिर्यादीच्या दोन्ही हातावर, डाव्या फसलीवर व उजव्या पायाच्या टोंगळ्यामागे मारले आणि जखमी केले. तसेच तिच्या पतीने तिला थापडाने मारहाण केली, अशा रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन बोरगाव मंजू यांनी भारतीय दंड विधान कलम 324, 504, 34 प्रमाणे गुन्हा नोंद करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 


सदर प्रकरणामध्ये प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, न्यायालय, अकोला यांनी साक्ष पुरावे तपासले. सदर साक्ष पुराव्यानुसार सरकार पक्ष आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सिद्ध करू शकले नाही. आरोपीचे वकील शितल प्रकाश ब्राह्मणे यांनी या प्रकरणात प्रखरयुक्तिवाद केला. आरोपी क्रमांक १ याने फिर्यादीला कोणतीही मारहाण केली नाही, ही पुराव्यात विसंगती आणून सिद्ध केले. यामुळे विद्यमान न्यायालयाने आरोपी क्रमांक १ तर्फे एडवोकेट शितल प्रकाश ब्राह्मणे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून भारतीय दंड विधान कलम 324, 504, 34 या गुन्ह्यातून व फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248 अन्वये निर्दोष मुक्तता केली. 



आरोपी क्रमांक १ तर्फे ॲड. शितल प्रकाश ब्राह्मणे यांनी न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडली. 

टिप्पण्या