court-update-crime-news-akl-: POCSO प्रकरणी आरोपीस जामीन ; बार्शीटाकळी मधील घटना, ॲड. एम.बी शर्मा यांचा प्रभावी युक्तिवाद




भारतीय अलंकार न्यूज 24

नीलिमा शिंगणे जगड 

अकोला: बार्शीटाकळी पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपी दर्शन पवार यास विशेष पॉक्सो न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. ॲड. एम.बी. शर्मा (ॲड.मधुसूदन शर्मा) यांनी न्यायालयात आरोपीची बाजू भक्कमपणे मांडली.


भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम ४८३ अन्वये, भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ६४(२)(i), ६५(१), ३५१(२), ३(५) सह POCSO , २०१२ च्या कलम ४ आणि ८ अन्वये शिक्षापात्र गुन्ह्यासाठी, बार्शिटाकळी पोलीस ठाणे, (ता. बार्शिटाकळी, जि. अकोला) येथे नोंदवलेल्या गुन्हा क्र. २८१/२०२६ च्या संबंधात अर्जदार (आरोपी) दर्शन रणजीत पवार याने न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. हा अर्ज  २९ मे २०२६ रोजी मंजूर करण्यात आला आहे.



घटनेची हकीकत 


फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता आणि तिची आई मामाच्या गावी राहत होती. एफआयआर दाखल करण्याच्या साधारण दोन महिने आधी, पीडिता आणि तिची आई एका शेतजमिनीवरील झोपडीत राहायला आल्या होत्या. येथे आरोपी पीडितेच्या आईला भेटायला आला होता. आरोपीने पीडितेला त्याच्याशी लग्न करण्यास विचारणा केली.  मात्र तिने नकार दिला. पुन्हा दोन-तीन दिवसांनी आरोपी पीडितेच्या आईला भेटायला आला. काही वेळाने पीडितेची आई पाणी आणायला गेली. आरोपीने पुन्हा पीडितेला त्याच्याशी लग्न करून पळून जाण्यास सांगितले. पीडितेने पुन्हा नकार दिला, तरीसुद्धा आरोपीने पीडितेवर अत्याचार केला. त्याच वेळी पीडितेची आई परत आली. तथापि, तिने कोणताही आक्षेप घेतला नाही. उलट, तिने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला निघून जाण्यास सांगितले. दिनांक ०५ एप्रिल २०२६ रोजी घराबाहेर असताना, आईने पीडितेला सांगितले की, ते कामासाठी 'नगर' येथे जाणार आहेत आणि तिथे ती (आई) पीडितेचे लग्न आरोपीशी लावून देईल. पीडितेने यास नकार दिला. यानंतर पिडीतेने ही सर्व हकीकत आपल्या मामाला सांगितली, ज्याने तिला पोलीस ठाण्यात नेले. तिथे एफ.आय.आर. (FIR) नोंदवण्यात आला. यानंतर पोलिसांनी आरोपीला दिनांक ०७ एप्रिल २०२६ रोजी अटक केली. तेव्हापासून आरोपी पोलीस कोठडीत होता.


न्यायालयात सरकार पक्षाने जामीन अर्जाला विविध मुद्द्यांवरून जोरदार विरोध केला. 



आरोपीचे वकील एम .बी. शर्मा यांचा युक्तिवाद 


अर्जदारातर्फे वकील एम.बी. शर्मा न्यायालय समोर तथ्य मांडले. ॲड. शर्मा यांनी केलेल्या युक्तिवाद मधील प्रमुख मुद्दे. 

*घटनेच्या वेळी आईने काहीच केले नाही, हा आरोप विश्वासार्ह मानला जाऊ शकत नाही. 

*एफ.आय.आर. नोंदवण्यात दोन महिन्यांचा विलंब झाला आहे. इतका दीर्घकाळ पाळलेले मौन या प्रकरणाबाबत संशय निर्माण करते. *पीडितेच्या मामासोबत असलेल्या काही इतर व्यवहारांमुळे आरोपीला या प्रकरणात खोटे गोवण्यात आले आहे. 

*आरोपीला दिनांक ०७ एप्रिल २०२६ रोजी अटक करण्यात आली. त्याची पोलीस कोठडीत चौकशी (Custodial interrogation) पूर्ण झाली आहे. तपास कार्येतः पूर्ण झालेला आहे. 

*पीडितेची आई ही या गुन्ह्यात सह-आरोपी आहे; ती सध्या फरार आहे. या आरोपीचा त्यामध्ये कोणताही सहभाग नाही. 

*घटनेपासून ते एफ.आय.आर. नोंदवण्यापर्यंतच्या दोन महिन्यांच्या कालावधीत, आरोपीने पीडिते सोबत कोणतेही गैरवर्तन  करण्याचा प्रयत्न केला किंवा तिला कोणत्याही प्रकारे धमकावले, असा कोणताही आरोप नाही. 

*अर्जदार हा स्थानिक रहिवासी आहे. तो जामिनाच्या अटींचे पालन करण्यास तयार आहे.




दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तथ्ये विचारात घेता, अर्जदार (आरोपी) दर्शन रणजित पवार यास अटी व शर्ती सह ५० हजाराच्या पर्सनल बाँडवर जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला. हा आदेश न्या. ए. डी. क्षीरसागर (विशेष न्यायाधीश, POCSO, अकोला) यांच्या कोर्टाने दिला आहे.



या प्रकरणी ॲड.एम.बी.शर्मा यांना ॲड.आशिष देशमुख यांनी सहकार्य केले.




टिप्पण्या