- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
court-news-pocso-case-justice: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपीची निर्दोष मुक्तता; ॲड. सी. एन. वानखडे यांचा प्रभावी युक्तिवाद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दा
जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय; पुराव्याअभावी आरोपी निर्दोष
भारतीय अलंकार न्यूज 24
नीलिमा शिंगणे जगड
अकोला | अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून तिला गर्भवती केल्याच्या गंभीर आरोप प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. हा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ चे न्यायमूर्ती श्री. क्षीरसागर यांनी दिला. न्यायालयात आरोपीची बाजू ॲड. सी.एन.वानखडे (ॲड. चंद्रकांत वानखडे) यांनी मांडली.
प्राप्त माहितीनुसार, बाळापूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारी वरून आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन बाळापूर यांनी कलम ३७६ (२), (i), (j), (n) भारतीय दंड विधान तसेच कलम ३, ४ पॉस्को ॲक्ट अंतर्गत गुन्हे दाखल केले होते. या तक्रार अर्जात फिर्यादीने आरोपीवर अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करून गर्भवती केल्याचा आरोप केला होता.
या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान आरोपीविरुद्ध ठोस आणि सबळ पुरावे सादर करण्यात सरकारी पक्षाला यश आले नाही.
पुरावे अपुरे असल्याने आणि आरोप सिद्ध न झाल्यामुळे न्यायालयाने आरोपी अनिल दशरथ सोळंके याची निर्दोष मुक्तता केली.
या प्रकरणात आरोपीच्या बाजूने ॲड. चंद्रकांत वानखेडे यांनी प्रभावी युक्तिवाद केला.
ठळक मुद्दे
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपी निर्दोष
जिल्हा व सत्र न्यायालय क्रमांक १ चा निर्णय
सरकारी पक्षाकडून ७ साक्षीदार तपासले
आरोपीविरुद्ध ठोस पुरावे सादर करण्यात अपयश
ॲड. चंद्रकांत वानखेडे यांचा प्रभावी युक्तिवाद
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा